ताज्या बातम्यामहाराष्ट्र

दादरमध्ये सावरकर गौरव यात्रेतून भाजप-शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन


स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना भाजपच्यावतीने दादर माहीम विधानसभा क्षेत्रात आज (दि.२) स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली

लेझीम, ढोल ताश्यांच्या गजरात दादरच्या सावरकर सदनापासून यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत भगवी टोपी व हातात मी सावरकर, असा फलक घेतलेले भाजप शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी व महिला व तरुणी, पारंपरिक वेश परिधान करून सहभागी झाल्या होत्या.

यावेळी लेझीम घेतलेल्या शालेय विद्यार्थिनींनी ढोल ताशांच्या तडतडाटावर ठेका धरला. डोक्यावर भगवी टोपी हातात फलक घेऊन यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वंदे मातरम… वीर सावरकरांचा विजय असो… अशी जोरदार घोषणाबाजी करत सारा परिसर दणाणून सोडला. शिवाजी पार्कला फेरफटका मारून यात्रा शिवसेना भवनासमोर येताच यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे जबाब दो, अशी घोषणाबाजी सुरु केली.

  1. सेना भवनाजवळून गौरव यात्रा सावरकर स्मारकाकडे निघाली. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सावरकरांचा वारंवार अपमान होत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही गौरव यात्रा काढण्यात आल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *