
तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव देण्यात येईल. त्यामुळे याच बैठकीत शाळा सुरू करण्यावर निर्णय होईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी आज दिली. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक नियोजित होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरला आहेत. त्यामुळे बैठक गुरुवारी होणार आहे. राज्य कोरोना कृती दलाची बैठकही होणार आहे. त्यामधला सूर लक्षात घेऊन गुरुवारी शाळांचा निर्णय होऊ शकतो, असे कडू म्हणाले.