दिल्ली – सीमा सुरक्षा दलातील (BSF) जवानांना रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेला दिल्लीत (Delhi) अपघात
दिल्ली – सीमा सुरक्षा दलातील (BSF) जवानांना रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेला दिल्लीत (Delhi) अपघात झाला.यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली पोलिसांनी दिली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा टायर फुटल्यानं चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बीएसएफ जवानांना उपचारासाठी नेत असताना अपघात झाला. यात मृत्यू झालेल्यांची नावे मनोज पासवान, बिहार आणि यशवीर सिंह, उत्तर प्रदेश अशी आहेत
पोलिसांनी सांगितले की, रुग्णवाहिका बीएसएफच्या सहा कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेत होती. यावेळी शास्त्री पार्क मेट्रो स्टेशनजवळ रुग्णवाहिकेला अपघात झाला. यात दोन्ही बीएसएफ जवान रस्त्यावर पडले आणि रुग्णवाहिकेखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी रुग्णवाहिकेतील इतरांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.