
पाथर्डी : मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसाटवाडी येथे ५ जानेवारी व माणिकदौंडी येथे ८ जानेवारी रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अविनाश पालवे म्हणाले की, वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च करणे, पैशाची नासाडी करणे यापेक्षा जनतेला फायदा होईल असा उपक्रम घेतला पाहिजे. समाजात काम करत असतांना गरजू व गोरगरीब लोक भेटतात ज्यांना पैशाअभावी नगर, पुणे येथे जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही, याचा विचार करूनच वाढदिवसानिमित्त जनतेच्या सेवेसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून डोळ्यांचा त्रास असणाऱ्या नागरिकांना मोफत तपासणी , शस्त्रक्रिया , अल्पदरात चष्मा या सुविधा मिळणार आहेत.
यावेळी माणिकदौंडीचे सरपंच शायद पठाण, रमेश पटेल, अर्जुन पाखरे, संभाजी पाखरे, अंकुश शिरसाट, अंबादास शिरसाट, कृष्णा पवार उपस्थित होते.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या शिबिरामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. अविनाश पालवे यांनी या शिबिराचे आयोजन केल्यामुळे उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार मानले. तसेच स्तुत्य उपक्रम घेतल्याने माणिकदौंडी परिसरामध्ये सरपंच अविनाश पालवे यांचे कौतुक होत आहे.