Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

1000 टनांचा ‘Gold शॉक’, चीनला लागलंय सोन्याचं वेड; 8 महिन्यांत भरलं भारताच्या तिजोरीतील एकूण सोन्यापेक्षा अधिक

चीनच्या गोल्डन गेमने सोन्याच्या बाजारात खळबळ उडवली आहे. चीनने एका वर्षापेक्षा जास्त काळापासून सोने खरेदीकचा सपाटा लावला असून केवळ 8 महिन्यांत भारताच्या भारताच्या एकूण सुवर्णसाठ्याला मागे टाकत 1000 टनांहून अधिक सोन्याची आयात केली आहे.या विक्रमी खरेदीमुळे जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आहे. चीनच्या गेल्या काही वर्षांपासून सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. चीनच्या सोन्याच्या खरेदीने जगभरात खळबळ उडवून दिली असून गेल्या 8 महिन्यांत म्हणजेच ऑगस्टपर्यंत परदेशातून 1000 टनांहून जास्त सोन्याची आयात केली आहे, जे भारताच्या एकूण सोन्याच्या साठपेक्षा खूप जास्त आहे. विशेष म्हणजे चीनने या वर्षाच्या केवळ आठ महिन्यांत 2025 मध्ये आयात केलेल्या सोन्यापेक्षा सर्वात मोठी सोने खरेदी आहे.चीनच्या सोने खरेदीचे कारण

गुंतवणुकीची जोरदार मागणी, जागतिक बाजारातील किंमतीतील घसरण आणि मजबूत चिनी युआन यासारखे घटक चीनच्या सोन्याच्या खरेदीतील वाढीमागील प्रमुख घटक आहेत. चीन जगातील सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार बनला असून या जलद खरेदीचा परिणाम जागतिक सुवर्ण बाजारावर तसेच भारतातील सोन्याच्या किमतींवरही होऊ शकतो.

1000 टनांपेक्षा जास्त सोने खरेदी” />

चिनी कस्टमच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट 2026 दरम्यान सोन्याची आयात 1000 टन किंवा 10 लाख किलोपेक्षा जास्त झाल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे, सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरानुसार ($4391 प्रति औंस) या सोन्याच्या आयातीचे मूल्य 13.52 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. 2017 पासून उपलब्ध नोंदी ठेवल्या जात असून या वर्षीची आयात आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *