Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

स्वीकृत नगरसेवकपदासाठी उल्हासनगरात चुरस; ३९ अर्ज दाखल, कोणाची लागणार वर्णी?

उल्हासनगर महानगरपालिकेच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी (स्वीकृत नगरसेवक) मंगळवारी एकूण ३९ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या तीन जागा असून पक्षाकडून तब्बल १९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहा महिन्यांपूर्वी गठीत झालेल्या महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी हे अर्ज भरण्यात आले. पालिकेतील संख्याबळाच्या आधारावर शिवसेनेचे तीन तर भाजपचे चार स्वीकृत सदस्य महापालिकेत जाणार आहेत. प्राप्त अर्जांमध्ये शिवसेनेशी संबंधित १७, भाजपचे ९, वंचित बहुजन आघाडीचे २ आणि अपक्षांचे २ अर्ज असल्याचे समोर आले आहे; तर काही अर्जांमध्ये पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

शिवसेनेकडून पंचम कलानी, सयानी मनोज दिलीप, तिरुपतीरेड्डी मोहनरेड्डी केशीरेड्डी, रमेश महादेव चव्हाण, मनिषा सुहास भानुशाली, हेमा पिंजानी, डॉ. प्रकाश नाथानी, रुपाली म्हस्के, वनवारी किशोर नारायणदास, अंकुश म्हस्के, रेश्मा नवले, निलेश बोबडे, राजवानी भारत रामचंद्र, जतिन इदनानी, राजू इदनानी, हरेश इदनानी, सुरेंद्र सावंत आणि संदीप डोंगरे यांच्या अर्जांचा समावेश आहे.

भाजपशी संबंधित कन्हैयालाल नाथानी, ॲड. पूनम गुप्ता, सुरेंद्र भगवान सिंह, इंदर गोपलानी, प्रदीप रामचंदानी, धनंजय बोडारे, राजेंद्र श्रीखंडे आणि कपिल अडसुळ यांचे अर्ज दाखल झाले आहेत. मात्र भाजपने यापूर्वीच प्रदीप रामचंदानी, धनंजय बोडारे, राजेंद्र श्रीखंडे आणि कपिल अडसुळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आशा पवार आणि सुरेश सोनावणे, तर अपक्ष म्हणून अजित सगळे आणि शोभा अवचार यांनी अर्ज दाखल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *