Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योजकांना गुंतवणूक करण्याचे आवाहन

देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम नागपूर येथे आकार घेत आहे. येत्या दहा वर्षात नागपूर हे सोलर इकोसिस्टीम चे हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात

गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील अवादा समूहाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली तसेच सोलर मॉडेल निर्मितीची पहाणी केली. त्यानंतर उद्योजकांशी संवाद साधला. अवादा उद्योग समूहाचे संस्थापक व अध्यक्ष विनीत मित्तल यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली.

नवीन नागपूरच्या प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे स्मार्ट इंडस्ट्रीसाठी इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पन्नास टक्के पेक्षा अधिक जागा अधिकृत झाली असून गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळत आहे. देशातील पहिले सोलर मॉडेल अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात तयार होत असून अवदासमूहाला त्यांच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी २५० एकर जागेची आवश्यकता आहे. ती देण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणीस यांनी केली. अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी अधिग्रहित केलेली जमीन संपली असून तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत तयार करावयाची आहे, तसेच वर्धा जिल्ह्यातील नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

अवादा हा सोलर मॉडल बनवणारा सर्वात मोठा सुपर उद्योग असून, ऍडव्हान्स इंटिग्रेशन मुळे स्मार्ट मॉड्युलची निर्मिती होत आहे. भूमिपूजनंतर वेगाने प्रकल्प पूर्ण झाला असून आज पाच हजार कामगार येथे काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. उद्योजकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०२९ पर्यंत उद्योगांना स्वस्त वीज मिळेल असा विश्वासही व्यक्त केला. तसेच सोलर बॅटरी स्टोरेजच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून २४ तास ऊर्जा उपलब्ध होईल यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. वाढवण बंदर तीन वर्षात पूर्ण होणार

वाढवण पोर्ट बंदर हे जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये समाविष्ट होणार आहे, येथून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरद्वारे गडचिरोली पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे लॉजिस्टिक खर्च ६० टक्के पेक्षा कमी होईल आणि राज्याच्या विकासाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. वाढवण बंदर येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *