मोठी बातमी : नांगरे-पाटलांच्या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करा, हायकोर्टाचा निर्णय, एकट्या नागपूरमध्ये नव्हे संपूर्ण विदर्भात DJ वर निर्बंध

दहीहंडी आणि मारबत उत्सवात नागपुरात डीजेच्या दणदणाटाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल घेतली असून नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजे निर्बंधावरील काढलेल्या अधिसूचनेची पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहे.
अधिसूचना काढल्यावरही दहीहंडी आणि मारबत मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजे वाजवण्यात आल्याचे व्हिडीओ पुरावे याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर सादर केले होते. ध्वनी प्रदूषणाच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्रिमूर्तीनगर मंडळाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, कोर्टात सादर करण्यात आलेल्या बातम्या तसेच व्हिडिओच्या आधारावर संबंधित आयोजका विरोधात योग्य कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. तर नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये डीजेवरील निर्बंधांचे आदेश लागू करण्याचा सूचना ही कोर्टाने दिल्या आहे.
DJ Ban Issue : नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये डीजेवरील निर्बंधांचे आदेश
डीजे बंदी किंवा ध्वनी प्रदूषणाच्या नियमानबाबत केवळ अधिसूचना काढणे पुरेसे नाही, तर त्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, हे निश्चित करणे ही कर्तव्य असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. तर नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये डीजेवरील निर्बंधांचे आदेश लागू करण्याचा सूचना ही कोर्टाने दिल्या आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्तांना 22 सप्टेंबरपर्यंत कोर्टात शपथपत्र दाखल करून कारवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश ही देण्यात आले आहे.
Nagpur Crime: विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत ध्वनिप्रदूषण; वेगवेगळ्या कारवाईत तीन गुन्हे दाखल
दुसरीकडेनागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत ध्वनिप्रदूषण झाल्यानं सितांबर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. तर इतर दोन वेगवेगळ्या कारवाईत एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नागपूर शहरात डीजे आणि विविध साऊंड सिस्टिमवर बंदी असतानाही विहिंपच्या शोभायात्रेत ध्वनिप्रदूषण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनादिना निमित्त रविवारी शहरात शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी वाजवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळले. परिणामी सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.



