राष्ट्रीय
जळगाव – पाचोरा दरम्यान आगीच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या.समोरुन येणा-या रेल्वेने अनेकांना उडवलं

जळगाव – पाचोरा दरम्यान पुष्पक एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या. मात्र समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची घटना घडली आहे.
या अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या भीषण अपघाताने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाचोरा ते माहेजी दरम्यान ही परधाडे येथे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीने ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धूर आल्याने आगीची अफवा पसरुन प्रवाशांनी रुळांवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुस-या दिशेने येणा-या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना उडवल्याची घटना घडली. या अपघातात ३५ हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहे.