
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसच्या दौऱ्यावर आहेत. दावोसमधून महाराष्ट्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दावोस येथे पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली आहे.
यामुळे भविष्यात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
दावोस येथे पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सोबतच येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक आमदार आणि महत्त्वाचे नेते फुटणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारणार आहेत असा दावा देखील यावेळी उदय सामंत यांनी केला आहे.
आज पुन्हा एकदा दावोसमधून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना आनंद होत आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्रासामधील गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. मला सांगताना आनंद वाटतो की, आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतची गुंतवणूक आणण्यात यश मिळालं आहे. उद्या देखील अशाप्रकारची गुंतवणूक आणण्यात यश मिळेल. मी जसं महाराष्ट्रातून दावोसला येत असताना सांगितलं होतं. विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, त्याला आज सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्यावर टाकलेला विश्वास महायुतीच सरकार म्हणून आम्ही सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उदय सामंत यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता. फडणवीसांच्या शपथविधीपूर्वीच शिवसेनेत फूट पडणार होती असं त्यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या आरोपाला देखील उदय सामंत यांनी यावेळी उत्तर दिलं आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक आमदार आणि महत्त्वाचे नेते फुटणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारणार आहेत असं सामंत यांनी म्हटलं आहे.
आतापर्यंत झालेले करार
1) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : 5200 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : गडचिरोली
2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 16,500 कोटी
रोजगार : 2450
कोणत्या भागात : रत्नागिरी
3) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 17,000 कोटी
रोजगार : 3200
कोणत्या भागात :
4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 12,000 कोटी
रोजगार : 3500
कोणत्या भागात : पालघर
5) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 750 कोटी
रोजगार : 35
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
6) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : 3,00,000 कोटी
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : गडचिरोली
7) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : 30,000 कोटी
रोजगार : 7500
कोणत्या भागात : नागपूर
8) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 1000 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : रायगड
9) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 2000 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : पुणे
10) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : एमएमआर
11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर
12) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 10,521 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
13) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 4000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
14) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 250 कोटी
रोजगार : 600
कोणत्या भागात : एमएमआर
15) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 10,750 कोटी
रोजगार : 1850
कोणत्या भागात : पुणे