राजकीय

मराठा आरक्षणाला विरोध नाही पण; पडळकरांवरील हल्ल्यानंतर भुजबळांनी दिला इशारा


मुंबई : इंदापूरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्यात आक्रमक भाषण करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चप्पलफेक केली.

या घटनेवर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसंच आमचा विरोध आरक्षणाला नाही तर झुंडशाही आणि दादागिरीला असल्याचं म्हटलंय. दादागिरी न थांबल्यास जशास तसे उत्तर देऊ अशा शब्दात छगन भुजबळ यांनी इशारा दिला आहे.

छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर पडळकरांवरील हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला.आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काही समाजकंटक लोकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली. या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो. मी आजही इंदापूर येथे जाहीर सभेत सांगितल आहे की ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ.

 

काय घडलं होतं?
इंदापूर तहसील कार्यालयासमोर गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आले असताना बाजूला असलेल्या मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली. ज्या ठिकाणी मराठा सकल समाजाचे आंदोलन सुरू होते. त्याच शेजारी शेतकऱ्याचे आंदोलन सुरू होते. मात्र असे असताना पडळकर हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी पोहोचले. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होत पडळकर ‘गो बॅक..गो बॅक’ अशा घोषणा देत आमदार गोपीचंद पडळकर यांना विरोध केला. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होत पडळकर ‘गो बॅक..गो बॅक’ अशा घोषणा देत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली.

काय म्हणाले होते पडळकर?
कॅन्सरचा पेशंट अजून दवाखान्यात घ्यायचा आहे त्याआधी सर्दी-खोकलावाला म्हणतो आहे मला आता घ्या आणि यात कंपाऊंडर रूपात सरकार आहे आणि याचा डॉक्टर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आपला विश्वास आहे. या सभा म्हणजे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील हे सोशल इंजिनिअरिंग आहे. आज ओबीसी एकत्र येत आहेत याचे श्रेय भुजबळ यांना जातं. यांनी डरकाळी फोडली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात समाज आहे, असं पडळकर म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *