Video :नितेश कुमार यांचा माफीनामा नको, आम्हाला त्यांचा राजकारणातील राजीनामा हवा – नवनीत राणा
लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यानंतर नितीश कुमार यांनी जाहीर माफी मागितली.
मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो, असं विधान नितीश कुमार यांनी केलं.
नितीश कुमार यांनी विधानसभेत केलेल्या विधानावर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. नितीश कुमार यांच्या डोक्यामध्ये किती घाण आहे हे त्यांनी आज बिहारच्या विधानसभेमध्ये बोलून देशवासियांना दाखवलं आहे. ज्या पद्धतीने नितीश कुमार यांनी घाण शब्द बोलले त्यांनी ते त्यांच्या घरापुरते मर्यादित ठेवले पाहिजे होते, असा निशाणा नवनीत राणा यांनी साधला. नितेश कुमार यांचा माफीनामा नको, आम्हाला त्यांचा राजकारणातील राजीनामा हवा आहे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. नितीश कुमार यांना राजकीय क्षेत्रात बंदी आणली पाहिजे, अशाप्रकारे जर नितीश कुमार वक्तव्य करत असेल तर बिहारच्या महिलांनी कोणाकडे पाहायचे?, असा सवालही नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.
VIDEO | "People with such mindset should not be in our country, leave politics alone. We want Nitish Kumar's resignation, not apology; this is a demand of daughters of the country," says Independent MP @navneetravirana on Bihar CM's remarks on population control in Assembly on… pic.twitter.com/W1US4mCCrt
— Press Trust of India (@PTI_News) November 8, 2023
भाजपा आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात-
नितीश यांच्या वक्तव्यावर आमदारांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. भाजपा नेते तारकिशोर प्रसाद म्हणाले की, मुख्यमंत्री हे वेगळ्या पद्धतीने बोलू शकले असते. तर भाजपा आमदार निक्की हेमब्रम म्हणाल्या की, मुख्यमंत्री दुसऱ्या शब्दात समजावून सांगायला हवे होते. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर नव्हता.
काय म्हणाले होते नितीश कुमार –
बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (७ नोव्हेंबर) चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते, “बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल.”
भारत की राजनीति में नीतीश बाबू जैसा अश्लील नेता देखा नहीं होगा।
नीतीश बाबू के दिमाग में एडल्ट "B" Grade फिल्मों का कीड़ा घूस गया है। सार्वजनिक रूप से इनके द्विअर्थी संवादों पर पाबंदी लगानी चाहिए।
लगता है संगत का रंगत चढ़ गया है!#MemoryLossCM #AslilNitish pic.twitter.com/WFFLrE5brT
— BJP Bihar (@BJP4Bihar) November 7, 2023