
कुणाचीही असो पण आई ग्रेटच असते. प्रत्येक आई आपल्या लेकरांना आपल्या जीवापेक्षाही जास्त जीव लावत असते. पण एखाद्या लहान लेकरांनी आपली आई गमावली तर त्यांचं काय होत असेल?
this is the cutest video ever pic.twitter.com/G1zuTQly8t
— why you should have an animal (@shouldhaveanima) August 26, 2023
हा विचार केला तर मन सुन्न होते. पण सध्या एका वाघांच्या लहान बछड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चिंपाझी या लहान बछड्यांची काळजी घेताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर या पिल्लांना ती आपल्या हाताने दुधाच्या बाटलीतून दूधही पाजत आहे. आपल्या अंगाखांद्यावर घेऊन पिल्लांसोबत खेळतानाही दिसत आहे. एकंदरीत या पिल्लांना चिंपाझीचा चांगलाच लळा लागला असून हे पिल्ले तिला लगडताना दिसत आहे.
वाघाच्या या बछड्यांना आई आहे की नाही यासंदर्भात माहिती समोर आली नाही पण चिंपाझी आणि बछड्यातील नाते पाहून आपलाही उर भरून येईल. कुठल्याही लहान पिल्लाला किंवा लेकराला आईची किंवा माया करणाऱ्या जीवाची गरज असते. वाघांच्या बछड्याला या चिंपाझीच्या रूपाने आईची माया मिळाली आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माया, प्रेम, सद्भावना, दया हे फक्त मानवच नाही तर प्राणीसुद्धा करू शकतात हे यावरून दिसून येते.