
पावसाळा आला की साथीचे आजार वाढतात.काही भाज्यांवरही त्याचा परिणाम होतो आणि आपले आरोग्य बिघडते.पावसाळा आला की काही भाज्या खाणं टाळल्या पाहिजेत. कारण बहुतेक भाज्यांमध्ये पावसाळा आला की किडे किंवा अळ्या पडण्यास सुरुवात होते.
पावसाळा सुरू झाला की पालेभाज्या खाणं टाळलं पाहिजे. पालक, मेथी, शापू अशा भाज्या खाणं पावसाळ्यात टाळावं, कारण या भाज्यांमध्ये छोट्या-छोट्या हिरव्या अळ्या पडतात.या अळ्या बहुतांश वेळा पानांच्या रंगाच्या असतात आणि काही वेळा आपल्या डोळ्यांना दिसत नाही.हिरव्या पालेभाज्यांव्यतिरिक्त कोबी आणि फ्लॉवर खाणं देखील पावसाळ्यात टाळलं पाहिजे. पावसाळा सुरू झाला की या भाज्यांध्ये देखील अळ्या पडण्यास सुरुवात होते.