दुधात खडीसाखर घालून प्यायल्याने वयस्करपणालाही येते तारुण्याची झळाळी, आयुर्वेदात का आहे याला अमृताचं महत्त्व?
आयुर्वेदा अनुसार दूधाला पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून एक संपूर्ण आहाराचं महत्त्व दिले गेलंय. दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, नियासिन, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, आयोडीन, मिनरल्स, फॅट, उर्जा, राइबोफ्लेविन (व्हिटॅमिन ब-२) याव्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, ड, क व ई हे पोषक तत्व आढळून येतात. याशिवाय पुजे दरम्यान किंवा मंदिरामध्ये प्रसाद म्हणून देवाला दाखवल्या जाणा-या खडीसाखरेचे एक वेगळेच व खास महत्त्व आहे.
कोमट दुधामध्ये खडीसाखर मिसळून हे दूध रात्री झोपण्याआधी प्यायल्याने चांगली व गाढ झोप लागते. हे ड्रिंक आपला मुड फ्रेश करण्यासोबतच डोकं शांत ठेवण्याचं देखील काम करतं. याव्यतिरिक्त मुड स्विंग्सची समस्या भेडसावत असेल तर हे दूध मुड ठीक करण्यासाठी प्यायलं जातं. मेनोपॉज नंतर होणा-या मुड स्विंग्सची समस्या दूर करण्यासोबतच डिप्रेशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा हे दूध लाभदायक समजले जाते.
करोना काळात बहुतांश लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशा परिस्थितीत २४ तास कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब व मोबाईलवर काम करणा-या लोकांनी नियमित रात्री कोमट दूधात खडीसाखर घालून पिणं फायदेशीर ठरू शकतं. दूध व खडीसाखर दोन्ही पदार्थ डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्तवाचे असतात. डॉक्टर देखील याचं सेवन करण्याचा सल्ला देतात. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांसाठी किंवा होऊ नये असं वाटत असल्यास खडीसाखरमिश्रित दूध नक्की प्यावं.