
अदांची भुरळ घालत नजरेच्या इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या, गौतमी पाटीलची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेत पुन्हा भर पडली आहे, ती बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाची.
रोहनने गौतमीला पत्र लिहीत थेट लग्नाची मागणी घातलीय. रोहन हा शेतकरी पुत्र आहे. त्याची शेती बागायती आहे, सोबत दुग्ध व्यवसाय आहे. बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील तो रहिवाशी आहे.
काय म्हटले आहे रोहनने पत्रात
बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील यांने गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, मी रोहन गलांडे पाटील. मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुनी लग्नाला तयार नसले तरी मी माणूसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तू जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ये.
यापूर्वी श्रीकांत गडालेने लिहिले पत्र
शेतकरीपुत्र श्रीकांत गडाले असं आहे. तो बीड याठिकाणी राहतो. श्रीकांत याने फेसबूकवर पत्र पोस्ट केलं आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याने गौतमी पाटीलशी कोणीच लग्न करणार नाही, असे पत्रात म्हटले होते. तुमच्या ठुमक्यावर लाखो जण फिदा होतील, पण लग्न कोणी करणार नाही. आत्मपरीक्षण करा, असा सल्ला श्रीकांतने दिला होता.