केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे.
तुम्हीही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल आणि झारखंड राज्यातील रहिवासी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.पीएम किसान निधी योजना केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. त्याचप्रमाणे, झारखंड सरकारकडून कृषी आशीर्वाद योजना राबवण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना 5000 रुपयांची मदत मिळते.
कृषी आशीर्वाद योजना
कृषी आशीर्वाद योजना ही झारखंड (Jharkhand) सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे, ज्यामध्ये 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर 5000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
खरीप हंगामाच्या लागवडीपूर्वी ही मदत दिली जाते. 5 एकर जमीन असलेले शेतकरी जास्तीत जास्त 25,000 रुपये अनुदान घेऊ शकतात.
राज्यातील पीएम किसान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 11,000 रुपये आणि कमाल 31,000 रुपयांचा लाभ मिळेल.
त्याचबरोबर, एखाद्या शेतकऱ्याकडे एक एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असल्यास, खरीप हंगामाच्या काढणीपूर्वी सरकारकडून 5000 रुपये अनुदान दिले जाईल.
पीएम किसान (PM Kisan) अंतर्गत त्यांना आधीच वार्षिक 6000 रुपयांचा लाभ मिळत आहे. अशा प्रकारे, वर्षभरात एकूण 11,000 रु. तसेच 5 एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याला 25,000 रुपये म्हणजे एकूण 31,000 रुपये मिळतील.
योजनेच्या अटी आणि शर्ती
– झारखंडमधील 22 लाख 47 हजार शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कृषी आशीर्वाद योजनेचा लाभ घेण्यासाठी झारखंडमधील फक्त लहान आणि अत्यल्प शेतकरीच अर्ज करु शकतात.
– 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.
झारखंडमध्ये काही काळापूर्वी ‘मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजने’साठी अर्ज मागवण्यात आले होते. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही http://mmkay.jharkhand.gov.in/ वर जाऊन अर्जाची स्थिती तपासू शकता. योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजना अॅप देखील आहे.