ताज्या बातम्या

पिले जन्माला घालण्यासाठी रस्त्यांवर तब्बल ५ कोटी नरभक्षक लाल रंगाचे खेकडे समुद्राच्या दिशेने


मेलबर्न : ख्रिसमस बेटावरील पूल आणि रस्त्यांवर तब्बल ५ कोटी नरभक्षक खेकडे आल्याने पर्यटक घाबरले होते. पिले जन्माला घालण्यासाठी हे लाल रंगाचे खेकडे समुद्राच्या दिशेने जात होते.
हे खेकडे दरवर्षी ऑस्ट्रेलियाच्या जंगलातून राष्ट्रीय उद्यानाच्या किनाऱ्यावर स्थलांतर करतात. यामुळे येथे सध्या पर्यटकांचे रस्ते अडवले जात आहेत. असे मानले जाते की पृथ्वीवरील जिवांचे हे सर्वांत मोठे स्थलांतर आहे. खेकडे निघून गेल्यावर संपूर्ण ख्रिसमस बेट लाल होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात खेकडे पाहून तेथे उपस्थित पर्यटक आणि स्थानिक लोक चक्रावून गेले आणि त्यांनी व्हिडीओ आणि छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली.

मोठे कष्ट खेकडे सांभाळण्यासाठी…
येथे खेकड्यांसाठी खास पूल बनवण्यात आले असून, अनेक अडथळेही बनवले आहेत. डॉ. तान्या डेट्टो यांनी सांगितले की, २००५ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात खेकडे या भागात स्थलांतरित होत आहेत. त्या म्हणाल्या की, ५ कोटी खेकड्यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून ते फ्लाइंग फिश कोव्हपर्यंतचा प्रवास सुरक्षितपणे पूर्ण करू शकतील.

– यावेळी पूल, रस्ते, खडक आणि इतर ठिकाणी फक्त खेकडे दिसत होते. पिलांना जन्म देण्यासाठी हे सर्व खेकडे समुद्राकडे निघाले होते. ख्रिसमस आयलँडचे कर्मचारी अनेक महिने आधीच खेकड्यांच्या स्वागताची तयारी सुरू करतात.

पुढील ५ ते ६ दिवसांत घालणार १ लाख अंडी
प्रत्येक मादी खेकडा हिंद महासागरात पुढील ५ ते ६ दिवसांत १ लाख अंडी घालेल. एका महिन्यानंतर, ही लाल बाळे किनाऱ्याकडे आणि ख्रिसमस बेटाच्या जंगलाकडे जातील. समुद्रातील खेकड्याची बहुतेक पिले वाटेत मासे आणि शार्क खातात. जगभरातून दरवर्षी येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. हे खेकडे नरभक्षक आहेत, म्हणून ते धोकादायक मानले जातात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *