Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

अवैध वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक करनाऱ्या टैक्टरवर महसुल पथकाची कारवाई .वाळूसह टॅक्टर जप्त

परंडा तालूक्यात वाळू चोरांचा धुमाकुळ दुर्गम भागात भर दिवसा वाळू चोरी

परंडा : सुरेश बागडे
तालूक्यातील नदी पात्रातुन मोठया प्रमाणात वाळूची चोरी होत असुन अवैध उत्खनन विरोधी महसुल च्या पथकाने दि २७ रोजी परंडा तालूक्यातील उंडेगाव , ताकमोड वाडी परिसरात वाळूची चोरटी वाहतूक करनाऱ्या जयसिंग जेकटे यांचा टॅक्टर पकडून कारवाई केली आहे .

परंडा तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार सुजित वाबळे यांच्या नेतृत्वा खाली तलाठी विकास नागटिळक, तलाठी ज्ञानेश्वर गुळमीरे, तलाठी महेश मुकदम , तलाठी चंद्रकांत कसाब , यांच्या पथकास उंडेगाव ते ताकमोडवाडी मार्गावर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाळूची अवैध उत्खनन करून जेकटेवाडी येथिल जयसिंग जेकटे यांच्या टॅक्टर मधून चोरटी वाहतूक करीत असताना आढळून आला .

महसुलच्या पथकाने टॅक्टर ताब्यात घेऊन , पोहेका गोडसे , पोना , कुंभार , पोकॉ चौगुले ,यांच्या मदतीने अंभी पोलिस ठाण्यात लावन्यात आला आहे .

परंडा तालूक्यातील नदी पात्रातून मोठया प्रमाणात रात्रीच्या अंधारात व दुर्गम भागात भर दिवसा वाळूची चोरी होत आहे तहसिलदार यांनी वाळू चोरी रोखन्या साठी , पथकांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *