ताज्या बातम्या
बीड महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा कळस, १३ एकर ऊस चार म्हशी आणि दोनशे कोंबड्या जळून खाक

बीड : महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा कळस पुन्हा एकदा पहावयास मिळाला आहे. ३३ केव्हीची विद्युत तार तुटून वडवणी तालुक्यातील बावी ताडा परिसरातील दामू राठोड आणि शेषेराव राठोड यांचा तब्बल १३ एकर ऊस चार म्हशी आणि दोनशे कोंबड्या जळून खाक झाल्या आहेत. शिवाय प्रल्हाद आडे यांचा गोठा जळून खाक झाला आहे. आग लागल्यानंतर जीव आणि संसार उपयोगी साहित्य वाचविण्यासाठी अक्षरशः शेतकरी कुटुंबाची मोठी धावपळ उडाली