महत्वाचेमहाराष्ट्र

नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार? काँग्रेसचा बडा नेता महाराष्ट्र दौऱ्यावर


राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही भाकरी फिरणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलानंतर आता लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याचवेळी पाटील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चाचपणी करणार आहेत.

दरम्यान विदर्भातील नेत्यानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तर नुकतीच भाई जगताप यांची उचलबांगडी करून मुंबई अध्यक्षपदाची माळ आता वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात पडली आहे. तर आता लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. गेल्या काही महिन्यापासुन काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसुन येत होती. नाना पटोले यांच्या कार्यशैलीवरून अनेक नेत्यांनी तक्रार केली होती. पहिल्यांदा बाळासाहेब थोरात त्यानंतर विदर्भातील काही नेते यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर गेल्या निवडणुकीवेळी काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये हायकंमाड, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देखील अनेक नेते भेटले होते. याच पार्श्वभुमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवस ते मोठ्या नेत्यांना भेटणार आहेत. त्याच्यांशी चर्चा करणार आहेत. यामुळे या चर्चेला आता बळ मिळालं आहे. यामुळे राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *