Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारणार ! – जयकुमार गोरे, पालकमंत्री

संत नामदेव महाराजांचे जीवनकार्य, विचार आणि भक्तीपरंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी पंढरपूर येथे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे. अनुमाने १५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबवावा, पहिल्या टप्प्यात १०० कोटी आणि दुसर्‍या टप्प्यात ५० कोटी रुपयांची कामे घ्यावीत, अशा सूचना ‘संत नामदेव महाराज स्मारक जिल्हास्तरीय समिती’च्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. स्मारकात संत नामदेव महाराजांची मूर्ती, माहिती केंद्र, जीवनचरित्र संग्रहालय, संतग्राम, वाचनालय, ध्यानकेंद्र, भजन-कीर्तनासाठी जागा, वसतीगृह, बहुउद्देशीय सभागृह आदी सुविधा प्रस्तावित आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संत नामदेव महाराजांचा जीवनप्रवास, तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई यांसह विविध संतांच्या कार्याची माहिती ‘संतग्राम’मधून देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *