Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

एथर एनर्जी संभाजीनगरात घडवणार कुशल वर्कफोर्स

इलेक्ट्रिक बाईक उत्पादक एथर एनर्जीचा छत्रपती संभाजीनगरातील प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने असल्याने कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दिशेने कंपनीने पाऊले उचलली आहे. यासाठी शहरातील चार शैक्षणिक आणि कौशल्य-विकास संस्थांसोबत सोमवारी सामंजस्य करार केले. या उपक्रमाचा उद्देश इलेक्ट्रिक वाहन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी प्रदेशातील टॅलेंट पाइपलाइन मजबूत करणे आहे.

आंतरराष्ट्रीय सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, आयएसआयईइंडिया प्रायव्हेट लिमिटेड, यशोदीप नॉलेज हब आणि जिजामाता आयटीआय, शेवगाव यांच्यासोबत कंपनीने सामंजस्य करार केले आले. एथरने ऑरिकच्या बिडकिन क्षेत्रात नवीन सुविधा उभारून प्रकल्प विस्तार सुरू केला आहे.

या चार संस्थांसोबत ईव्ही-केंद्रित अभ्यासक्रम डिझाइन, फॅकल्टी डेव्हलपमेंट, तांत्रिक प्रशिक्षण आणि इंडस्ट्री-लिंक्ड प्रॅक्टिकल लर्निंगवर काम करेल. विद्यार्थी आणि फॅकल्टी यांना एथरच्या तांत्रिक आणि उत्पादन टीम्ससोबत काम करून ईव्ही टेक्नॉलॉजीज आणि आधुनिक उत्पादन पद्धतींचा अनुभव मिळेल.

यात उदयोन्मुख ईव्ही टेक्नॉलॉजीज, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, सेफ्टी आणि क्वालिटी प्रॅक्टिसेस यांचा समावेश असणार आहे. याबाबत कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर संजीव कुमार सिंह म्हणाले, संभाजीनगरातील शैक्षणिक संस्थांचा मजबूत पाया आणि उत्साही तरुण आहेत, त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच त्यांच्यासोबत काम करायचे ठरवले.

कंपनीच्या चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर सुरभी लोशाली म्हणाल्या, कंपनीचा विस्तार करताना कुशल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. हे संभाजीनगर आणि प्रदेशातील मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या दीर्घकालीन कौशल्य विकासासाठी उपयोगी राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *