दैनंदिन वस्तूच्या पॅकेजिंग नियमात बदल; तुमचं तेल, शाम्पू-साबण शाकाहारी की मांसाहारी हे स्पष्ट दिसणार!

केंद्र सरकारने देशातील ग्राहकांच्या सामाजिक तत्वांच्या दृष्टिकोनाने महत्वाचा निर्णय जारी केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011 मध्ये बदल केले आहेत.
हे बदल काही ठराविक प्रोडक्ट्सच्या पॅकेजिंग संदर्भात आहेत. तसेच देशातील सर्वच संबंधित कंपन्यांना लागू आहेत. ग्राहकांच्या तत्वांच्या दृष्टिकोनाचा विचार करता प्रशासनाने हे निर्णय घेतले आहे.
वस्तूंच्या पॅकेजिंगमध्ये नेमका कोणता बदल करण्यात आला आहे?
नियमातील नव्या बदलानुसार आतापासून संबंधित कंपन्यांना काही नव्या ठराविक प्रॉडक्ट्सच्या पॅकेजिंगवर समोरच्या बाजूला लाल/तपकिरी किंवा हिरव्या रंगाचे चिन्ह (डॉट) देणे अनिवार्य असणार आहे. 21 सप्टेंबर 2026 रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे. लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाल/तपकिरी तसेच हिरव्या चिन्हांचा अर्थ काय?
ज्या वस्तूंच्या पॅकेजिंगवर समोरच्या बाजूला लाल किंवा तपकिरी रंगाचा डॉट दिसेल याचा अर्थ असा की ते प्रॉडक्ट तयार करण्याच्या प्रक्रियेत नॉन-व्हेज पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. तर हिरव्या रंगाचा डॉट असलेले प्रॉडक्ट पूर्णपणे व्हेज असतात. भारतात बहुतेक मंडळींची तत्वे असतात. अशात एखादी वस्तू खरेदी करतेवेळी त्या वस्तूची व्हेज असण्याची खात्री करण्यासाठी ग्राहकाला पॅकेजिंगच्या मागच्या बाजूवर असणारी Ingredients ची भलीमोठी यादी तपासावी लागते. परंतु आता या नव्या बदलामुळे ग्राहकाला पॅकेजिंगच्या समोरील बाजूवर असणाऱ्या डॉटकडे पाहूनच प्रॉडक्ट व्हेज आहे की नॉन-व्हेज? याची खात्री करता येणार आहे.
कोणकोणत्या नव्या प्रॉडक्ट्सच्या पॅकेजिंगवर डॉट अनिवार्य करण्यात आला आहे?
साबण
शॅम्पू
टूथपेस्ट
कॉस्मेटिक्स
टॉयलेटरीज
कंपन्यांना करावी लागेल तारेवरची कसरत
आता साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीज या प्रॉडक्ट्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या पॅकेजिंगमध्ये बदल करावा लागणार आहे. जर प्रॉडक्ट्स तयार करण्यात नॉन-व्हेज घटकांचा वापर करण्यात आला असेल तर पॅकेजिंगवर लाल किंवा तपकिरी रंगाचा डॉट द्यावा लागेल तर पूर्णपणे व्हेज प्रॉडक्ट्ससाठी हिरवा डॉट द्यावा लागेल. मुळात 21 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या राजपत्रामध्ये संबंधित कंपन्यांनी जुनी पॅकेजिंग असलेल्या प्रॉडक्ट्सचा साठा कधीपर्यंत वापरावा? याची मुदत नमूद नाही.



