Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

अबब.! ‘या’ दिग्गज स्टॉकब्रोकर्सने 700 कोटींना विकत घेतले मुंबईतील आलिशान टॉवर, ठरला देशातील सर्वात मोठा व्यवहार

भारतातील सर्वात मोठ्या रिटेल स्टॉकब्रोकर्सपैकी एक असलेल्या Angel One Ltd चे संस्थापक दिनेश ठक्कर यांनी मुंबईत तब्बल 711 कोटी ($74.3 दशलक्ष) किमतीला एक आलिशान निवासी टॉवर (Embassy-Tower) खरेदी केला आहे.

हा देशातील एका स्वतंत्र निवासी घरासाठी झालेला सर्वोत मोठा व्यवहार देखील ठरला आहे.

Angel One हे सध्या स्टॉकब्रोकर्ससाठी वापरातील प्रसिद्ध अॅपपैकी एक आहे. या अॅपचे संस्थापक दिनेश ठक्कर असून त्यांनी आपल्या स्वप्नातील घरासाठी तब्बल 700 कोटींचा व्यवहार केला आहे. ठक्कर यांनी घेतलेला आलिशान टॉवरचे मुख्य द्वार समुद्राच्या दिशेने आहे. यात आठ मजले असून 63,000 चौरस फूट (5,853 चौरस मीटर) क्षेत्रफळात तो व्यापलेला आहे.
या मोठ्या व्यवहाराची माहिती टॉवरचे विकासक Embassy Developments Ltd आणि दिनेश ठक्कर यांनी मंगळवारी दिलेल्या संयुक्त निवेदनातून दिली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या माहितीनंतर Embassy Developments च्या शेअरच्या किमतीत सुरुवातीच्या व्यवहारात 8.3% पर्यंत वाढ झाली होती.

कोविडमध्ये ऑनलाईन ट्रेडिंगला चालना

दिनेश ठक्कर यांचा ब्रोकिंग व्यवसाय 2020 मध्ये मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. कोविड-19 महामारीदरम्यान लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन ट्रेडिंगला मोठी चालना मिळाली होती. त्याचाच फायदा Angel One सारख्या कंपन्यांना झाला होता.

लक्झरी घरांच्या बाजाराला तेजी

ठक्कर यांनी केलेला व्यवहार हा भारतातील लक्झरी रिअल इस्टेट बाजारातील चढता आलेख दर्शवतो. देशातील वाढती संपत्ती आणि छोट्या शहरांमधून उदयास आलेल्या कंपन्यांच्या शेअर बाजारातील लिस्टिंगमुळे अतिश्रीमंत भारतीय नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.

गेल्या वर्षी USV Pvt Ltd च्या अध्यक्षा लीना गांधी तिवारी यांनी 639 कोटींचा अपार्टमेंट खरेदी केला होता. तसेच बँकर उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने समुद्रकिनाऱ्यालगतचा एक टॉवर 400 कोटींपेक्षा अधिक किमतीला खरेदी केला होता.

भारतातील काही शहरांमध्ये लक्झरी अपार्टमेंट्सची विक्री काही तासांतच पूर्ण झाल्याची उदाहरणे आहेत. प्रीमियम अपार्टमेंट्सच्या किमती न्यूयॉर्कमधील काही भागांतील घरांच्या किमतींशीही स्पर्धा करू लागल्या आहेत.
Embassy Developments ने जानेवारीमध्ये मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात प्रवेश केला. कंपनीने शहरात निवासी टॉवर्स उभारण्यासाठी 4,500 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली होती.

ठक्कर यांनी ज्या आलिशान परिसरात घर खरेदी केले आहे, त्याच परिसरातील Embassy च्या एका प्रकल्पाची एकूण विकास क्षमता (Gross Development Value) 3000 कोटींपेक्षा जास्त आहे. या प्रकल्पात प्रत्येक मजल्यावर केवळ एकच निवासस्थान असून, तेथून समुद्राचे नयनरम्य दृश्य दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *