Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

भारतावर कारवाई करण्याचा विचारही करू नका, गंभीर परिणाम होतील, अमेरिकेला इशारा, थेट..

अमेरिकेने पुन्हा टॅरिफ लावण्यास सुरूवात केली. अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक मंजूर झाला. या विधेयकानुसार, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के टॅरिफ लावणा जाणार. भारत चीन यासारख्या देशांवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे.

काही महिन्यांपूर्वीच भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता. त्यानंतर पुन्हा टॅरिफचे मोठे संकट भारतावर आहे. जेपी मॉर्गन चेजचे सीईओ जेमी डिमॉन यांनी भारतावरील कारवाईवर बोलताना म्हटले की, अमेरिकेने भारतावर मोठी कारवाई करण्याअगोदर परिणाम देखील पाहावीत. अमेरिकेने भारत आणि पुर्ण देशाच्या तेल बाजारावर होणारा परिणाम लक्षात घेतला पाहिजे. डिमॉन म्हटले की, वॉशिंग्टनने पहिले समजून घेतले पाहिजे की, भारतीय रिफायनरी रशियाकडून घेत असलेल्या तेलाचा वापर कसा करते.

एक अशी आशा नक्कीच आहे की, अमेरिका सर्व व्यवस्थित समजून घेईल आणि जर भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणार नाही आणि दुसऱ्या देशाकडून तेल खरेदी करणार आहे ते भारतीय तेल रिफायनरीसाठी नक्कीच योग्य नाही. डिमॉन यांचे हे विधान अशावेळी आले आहे, ज्यावेळी अमेरिका भारतावर टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. आता अमेरिकेकडून रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याचा अधिकार मिळाला आहे.

फक्त रशियावर दबाव टाकण्यासाठी हे करणे योग्यन नाही, कारण त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावरही होईल. अमेरिकेने युक्रेनला समर्थन देण्यासाठी पाऊले नक्कीच उचलली पाहिजेत. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर अमेरिका आणि युरोपीयन देशांकडून दबाव वाढला आहे. भारतावर रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने सतत टीका होत आहे. पण भारत त्याचा विरोध करत आहे.

रशियाकडून भारत कच्चे तेल खरेदी करत असल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात आहेत. भारत आपल्या व्यापार आणि आर्थिक सुरक्षेसाठी ही पाऊले उचलत असल्याचे भारताने अनेकदा म्हटले. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रशियाकडून तेल खरेदी करणारा देश आहे. चीन हा रशियाकडून तेल खरेदी करणारा पहिल्या नंबरचा देश आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणात चीन तेल खरेदी करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *