शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील आंबे येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता चौथी) परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
या परीक्षेसाठी शाळेतील नऊ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या परीक्षेत शाळेचा शंभर टक्के निकाल लागला तर पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. अशी माहिती मुख्याध्यापक यू. एन. वाडीकर यांनी दिली.
या परीक्षेत सुयश संपादित केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे कोमल बुधा हेमाडे (गुण 260, गुणवत्ता यादी क्रमांक 234), अमृता राजाराम चिमटे (गुण 260, गुणवत्ता यादी क्रमांक 233), आदिराज अंकुश चिमटे (गुण 256, गुणवत्ता यादी क्रमांक 307), आयुष नंदकुमार रावते (गुण 250, गुणवत्ता यादी क्रमांक 456) प्रवीण उल्हास घोडे (गुण 246, गुणवत्ता यादी क्रमांक 570) तर सार्थक भगवान डगळे, साहिल हनुमंत घोडे, प्रीती गणेश असवले, विराज मंगेश हेमाडे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यासोबतच इयत्ता 5 वी शिष्यवृती परीक्षेत अनुजा राजू पारधी व इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेत विशाल संतोष काळे यांनी यश मिळविले, तर शहापूर येथील एकलव्य रेसिडेन्सी स्कूल साठी श्रुती नंदकुमार रावते या विद्यार्थिनीची निवड झाली.
या विद्यार्थ्यांना शिक्षक दिनेश माळी, अमरदीप कांबळे, दिगंबर घोडके, संतोष साबळे, दशरथ दिवटे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे स्थानिक ग्रामस्थांनी अभिनंदन केले.



