‘ही’ इच्छा पूर्ण झाली तर ३ कोटी लोकांना मदत करणार! लालबागच्या राजाच्या चरणी भक्ताची अनोखी इच्छा,

नवसाला पावणारा राजा’ अशी ख्याती असलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध ‘लालबागच्या राजाच्या’ दर्शनासाठी लाखो भाविक येत आहेत. तसेच भाविकांकडून लालबागच्या राजाला भरभरून दान देखील दिलं जात आहे.
ज्यामध्ये भारतीय चलनी नोरा, अमेरिकन डॉलर्स, सोनं-चांदीच्या वस्तूंसह लाकडी बॅट देखील देण्यात आली आहे. तसेच एक भाविकाने लालबागच्या राजाच्या चरणी एक चिठ्ठी लिहून आपली इच्छा व्यक्त केली आहे. ती चिठ्ठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालबागचा राजा हा जगभरातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येथे येऊन गणरायाचे दर्शन घेत आहेत. अशातच एका भक्ताने राजाच्या चरणी एक इच्छा मागीतली आहे. ज्यामध्ये त्याने ”माझ्या आईने नवस केला म्हणून मी तुझ्या दरबारात आलो. मला मोठा इंडियन क्रिकेटर बनव. तू मला इंडियन क्रिकेटर केलस, तर मी ३ करोड गरिबांना मदत करेन.” असे लिहले आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना एक चिट्ठी सापडली. ज्यामध्ये ”मला मोठा इंडियन क्रिकेटर बनव. तू मला इंडियन क्रिकेटर केलस, तर मी ३ करोड गरिबांना मदत करेन” असे लिहले होते. ‘ज्याची इच्छा ती मी गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करत आहे. आता तुमची इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.
गणेश मंडपांत भाविकांची मोठी गर्दी
मुंबईतील १२ दिवसीय गणेशोत्सवाचा नववा दिवस असलेल्या मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी ‘लालबागचा राजा’च्या मंडपात भाविकांची मोठी गर्दी झाली होती; गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी मंडपांमध्ये भाविकांची सतत वर्दळ दिसून येत आहे.
सेलिब्रिटींनीही घेतले राजाचे दर्शन
गणेशोत्सवादरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेतले आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान यांच्यासह या मंडपाला भेट दिली. यावेळी त्यांनी लालबागचं राजाची आरती करत गणरायाचे दर्शन घेतले. तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंग यानेही ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेतले होते.



