Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

आख्यानकाव्ये म्हणजे परस्परांना जोडणारी भाषिक परिसंस्था, डॉ. रमेश वरखेडे यांचे प्रतिपादन

पारंपरिक आख्यानकाव्यांच्या समकालीन प्रस्तुततेचा मागोवा घेत असताना ही काव्ये म्हणजे इतिहासातील केवळ स्मारके किंवा अस्मितापुष्टीची साधने नसून एक जिवंत आणि परस्परांना जोडणारी भाषिक परिसंस्था ठरते, असे मत ज्येष्ठ समीक्षक व भाषातज्ञ डॉ. रमेश वरखेडे यांनी व्यक्त केले. लोकसंस्कृतीच्या ज्ञानमीमांसेचा, शैव- शाक्त तत्त्वज्ञानाच्या लोकआध्यात्मिक रूपांतराचा आणि भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे ज्ञानशास्त्र उलगडून सांगणारा डॉ. प्रकाश खांडगे यांनी संपादित केलेला ग्रंथ म्हणजे उपयोजित ज्ञानमीमांसेचा प्रमाणग्रंथ असल्याचेही डॉ. वरखेडे म्हणाले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळ प्रकाशित व ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे संपादित शिवशक्ती संप्रदायाची लोक – गान परंपरा या पुस्तकावर आयोजित परिचर्चेत ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात 19 सप्टेंबर रोजी ही परिचर्चा संपन्न झाली. याप्रसंगी चर्चक म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. मुकुंद दातार, डॉ. मुकुंद कुळे, प्रसिद्ध तुरेवाले बबनराव चौरे हे मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *