Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

राज्यातील 5 शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा, मतदान अन् मतमोजणी कधी?

राज्यातील 5 शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट आली आहे. निवडणूक आयोगाने राज्याील पाच शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये अमरावती, पुणे , नागपूर, औरंगाबाद विभागाचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर याची मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होईल. निवडणुकीच्या घोषणेमुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

राज्यात आता निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. महाराष्ट्रातील पाच विधानपरिषदेच्या जागेच्या निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. विधानपरिषदेतील रिक्त होणार्‍या जागांवर निवडणुका होणार आहेत. या विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया ही 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. तर 27 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ५ जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आल्याने सर्व राजकीय पक्ष आता जोरदारपणे कामाला लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *