स्वीकृतसाठी आतापासूनच ‘फिल्डिंग’ शासन नियुक्तीसह अन्य दोन संचालकांची नावे नेहमी संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर ठरतात. मात्र, आताच्या निवडणुकीत ही नावे निश्चित करूनच पॅनेल होण्याची शक्यता आहे. यासाठी नेत्यांसह इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. तसेच महायुतीत स्थान मिळालेच नाही, तर पर्यायही उपलब्ध असल्याचेही इच्छुकांकडून सांगण्यात येते, तर काहींकडून मी ‘फिक्स’ आहे, असाही विश्वास दाखवला जात आहे.

भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीद्वारे जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे.
संपूर्ण जगाला ग्रासणाऱ्या महामारीवर उपाय शोधून आणि त्याचे इतर देशांना वितरण करून, देशाने आपली क्षमता आणि आत्मनिर्भरता सिद्ध केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले.
शनिवारी हुबळीच्या गब्बूरजवळ केएलई संस्थेने उभारलेल्या जगद्गुरु गंगाधर महास्वामी मुरुसावीरमठ वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केएलई रुग्णालय, वैद्यकीय संशोधन केंद्र व वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केले. प्रकृती अचानक बिघडल्यामुळे अमित शाह उद्घाटन समारंभाला उपस्थित राहू शकले नाही. मात्र, हुबळीहून दिल्लीला परतण्यापूर्वी अमित शाह यांनी सायंकाळी 5:10 वाजता मुरुसावीरमठ वैद्यकीय महाविद्यालय, केएलई रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राला भेट दिली.
सकाळी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मुरुसावीरमठ वैद्यकीय महाविद्यालय, केएलई रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, भारताच्या औषधनिर्मिती बाजारपेठेचे मूल्य सध्या 60 बिलियन डॉलर्स इतके आहे. 2023 पर्यंत ते 130 बिलियन डॉलर्स आणि 2047 पर्यंत 450 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारत केवळ स्वस्त जेनेरिक औषधांचा उत्पादक या भूमिकेच्या पलिकडे जाऊन संशोधन आणि बायोफार्मास्युटिकल अविष्कारातही जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. जगाला परवडणाऱ्या दरात दर्जेदार औषधे आणि लसींचा पुरवठा करून भारत जागतिक आरोग्यसेवेमध्ये महत्त्वापूर्ण आणि अपरिहार्य शक्ती म्हणून उदयास येत आहे, असे सांगितले.
केएलईने उत्तर कर्नाटकाच्या विकासात बजावलेली भूमिका महत्त्वापूर्ण
मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिष्ठित ‘केएलई सोसायटी’ची प्रशंसा केली. उत्तर कर्नाटकाच्या विकासामध्ये या संस्थेने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका आणि रोजगार, शिक्षण, अर्थव्यवस्था, आरोग्य व वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत या प्रदेशासाठी दिलेले भरीव योगदान त्यांनी अधोरेखित केले. हुबळी येथे 700 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय संकुल 50 एकर क्षेत्रावर पसरलेले असून, त्याचे एकूण बांधकाम क्षेत्र 30 लाख चौ. फूट इतके आहे. या भव्य आरोग्य सुविधा केंद्रामध्ये अत्याधुनिक अध्यापन सुविधा, संशोधन क्षमता आणि रुग्णालय सेवांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे, असेही केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील म्हणाले, कर्नाटक हे देशातील एक प्रमुख आरोग्यसेवा केंद्र म्हणून उदयास आले आहे. 1960 च्या दशकात राज्य सरकारने वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम खासगी संस्थांसाठी खुले केले, ज्यामुळे राज्यात खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्रांती झाली, असे ते म्हणाले.
पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, केएलई संस्थेच्या स्थापनेला 110 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी ‘सप्तर्षीं’नी शैक्षणिक संधींची कमतरता भासू नये म्हणून सुरू एक छोटी शाळा सुरू केली. याच केएलई संस्थेत आज 1,50,000 विद्यार्थी आणि 18,000 कर्मचारी आहेत. केएलईद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये एकूण 5,500 बेड्सची सुविधा आहे. भविष्यात संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी अमेरिकेशी चर्चा सुरू असल्याचेही डॉ. प्रभाकर कोरे यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला मुरुसावीरमठचे जगद्गुरु गुरुसिद्ध राजयोगिंद्र स्वामीजी यांची विशेष उपस्थिती होती. खासदार जगदीश शेट्टर आणि बसवराज बोम्माई, विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी, राज्यसभा सदस्य एम. नागराज्। आमदार अरविंद बेल्लद, प्रसाद अब्बय्या, महेश टेंगिनकाई, एम. आर. पाटील, केएलईचे अध्यक्ष महांतेश कौजलगी आणि कार्याध्यक्ष अमित कोरे, माजी खासदार रमेश कत्ती, माजी मंत्री मुरुगेश निराणी तसेच डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. अशोक शेट्टर, शंकरण्णा मुनवळ्ळी, महंतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.
सायंकाळी दिल्लीला परतण्यापूर्वी भेट
हुबळीच्या गब्बूरजवळील 1,200 बेड्स क्षमतेचे केएलई रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी मध्यरात्री 12:30 च्या सुमाराह हुबळीला आले होते. येथील एका हॉटेलमध्ये रात्री ते वास्तव्यास होते. मात्र, सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे उपचारानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉटेलमध्ये विश्रांती घेतली. सायंकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी मुरुसावीरमठ वैद्यकीय महाविद्यालय, केएलई रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राला भेट दिली.
याप्रसंगी अमित शाह यांनी केएलई अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे चान्सलर पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच याप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी चर्चा केली. ‘मला सकाळपून पोटात तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यायाच्या उद्घाटन उद्घाटन समारंभाला उपस्थित राहू शकलो नाही, असे सांगितले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा हावेरी येथील पारंपरिक फेटा घालून सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रभाकर कोरे आणि केएलई सोसायटीचे इतर संचालक व अधिकारी यांच्याकडून त्यांनी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती घेतली. वैद्यकीय क्षेत्रात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘एआय’ प्रयोगशाळेची पाहणी केली. त्यानंतर ते सायंकाळी 5:30 ज्या सुमारास विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले.



