Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

“मी जीवन संपवतोय.” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विकास समुद्रे यांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

दरम्यान अशातच त्यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. विकास समुद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘मी जीवन संपवत आहे’ अशी पोस्ट केली. ही पोस्ट पाहताच चाहत्यांना त्याची काळजी वाटू लागली. दरम्यान या सगळ्यात मुंबई पोलीस दल तात्काळ सतर्क झाले आणि त्यांनी विचारपूस केली.

विकास यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सायबर विभागाने त्यांच्याशी संपर्क साधला. तसंच पोलिसांनी अभिनेत्याचा शोध घेत त्यांच्या तब्येतीबाबत आणि सुरक्षेबाबत विचारपूस केली. दरम्यान या पोलिस तपासादरम्यान एक मोठी बाब समोर आली. विकास समुद्रे यांचा जीवन संपवण्याचा कोणताही विचार नव्हता. फेसबुकला पोस्ट करताना टायपिंग मिस्टेक झाली होती, आणि ती अपलोड झाली. परंतु या चुकीमुळे सगळीकडे गैरसमज पसरला. दरम्यान विकास समुद्रे हे सुखरुप आहे.

त्यांनी जीवन संपण्याच्या केलेल्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्स आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्याची ती पोस्ट डिलिट केली, आणि पुर्णपणे ठीक असल्याचं सांगितलं. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना विकास समुद्रे यांनी आयुष्याच्या कठीण काळाबद्द्ल सुद्धा भाष्य केलं होतं. त्यांना काही वर्षापूर्वी ब्रेन हॅम्रेज झाल्याचं ते म्हणाले होते. त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट काळ होता असं ते पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *