Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात.

  • सैनिकांची दिशाभूल करण्यासाठी डीपफेकचा वापर
  • अँथ्रोपिकचा खळबळजनक खुलासा
  • सायकोलॉजिकल वॉरफेअर आणि आत्मसमर्पण संदेश

मध्यपूर्वेतील येमेन देशात सुरू असलेल्या संघर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ( Houthi AI ) वापराचा एक अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे.

येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांवर (Houthi Fighters) असा आरोप करण्यात आला आहे की त्यांनी येमेनी लष्कराच्या नॅशनल रेझिस्टन्स फोर्सेसचे प्रमुख आणि वरिष्ठ लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल तारिक सालेह यांच्या आवाजाची नक्कल (Voice Cloning) करण्यासाठी प्रगत AI तंत्रज्ञानाचा वापर केला.

हा बनावट ऑडिओ मेसेज (Deepfake Audio) अशा वेळी पसरवण्यात आला जेव्हा हुथी बंडखोर आणि येमेनी लष्करादरम्यान लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या अत्यंत मोक्याच्या ‘मोचा’ (Mocha) शहरावर ताबा मिळवण्यासाठी भीषण लढाई सुरू होती. या AI द्वारे तयार करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सालेह यांच्यासारखा हुबेहूब आवाज सैनिकांना असा संदेश देत होता की, ‘युद्धात कधी मागे हटावे लागते तर कधी पुढे जावे लागते; सैन्य वाचवण्यासाठी सर्व तुकड्यांनी मोचा शहरातून त्वरित माघार घ्यावी’.या बनावट संदेशामुळे आघाडीवर लढणाऱ्या सैनिकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आणि त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला गेला.

‘अल-जुम्हूरिया टीव्ही’ आणि लष्कराचे अधिकृत स्पष्टीकरण

हा ऑडिओ मेसेज सोशल मीडियावर आणि स्थानिक मेसेजिंग ॲप्सवर वेगाने व्हायरल झाल्यानंतर येमेनी लष्कराच्या मीडिया टीमने तातडीने यावर स्पष्टीकरण दिले. मोचा शहरातून प्रक्षेपित होणाऱ्या ‘अल-जुम्हूरिया टीव्ही’ (Aljoumhouriya TV) या सॅटेलाइट चॅनलने या घटनेचा पर्दाफाश करत सांगितले की, हुथींनी जनमताची दिशाभूल करण्यासाठी आणि सैन्याचे मनोबल तोडण्यासाठी AI चा वापर करून हा खोटा ऑडिओ तयार केला होता.

कमांडर तारिक सालेह यांच्या मीडिया विंगने स्पष्ट केले की, लष्कराशी संबंधित कोणतेही अधिकृत आदेश किंवा निवेदने केवळ अधिकृत लष्करी माध्यमांद्वारेच जारी केली जातात. सैनिकांनी आणि नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा संशयास्पद ऑडिओ संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन लष्कराकडून करण्यात आले.या डीपफेक ऑडिओसोबतच हुथींनी मध्यरात्री सैनिकांना आत्मसमर्पणाचे मेसेज पाठवून शस्त्रे खाली ठेवल्यास माफी देण्याचे आमिषही दाखवले होते.

क्षितिज ओलांडणारा AI चा लष्करी वापर: क्षेपणास्त्र सॉफ्टवेअर बनवण्याचा प्रयत्न

कमांडरच्या आवाजाची नक्कल करण्याव्यतिरिक्त, येमेनमध्ये AI च्या लष्करी वापराबद्दल एक अधिक गंभीर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढवणारा अहवाल समोर आला आहे. प्रसिद्ध अमेरिकन AI कंपनी ‘अँथ्रोपिक’ (Anthropic) ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या १४५ पानांच्या सुरक्षा अहवालात एक मोठा खुलासा केला आहे. उत्तर येमेनमधील एका शस्त्रास्त्र विकास गटाने अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड’ (Claude Code) या AI मॉडेलचा वापर करून क्षेपणास्त्रे आणि रॉकेट गाइडन्स सिस्टीमचे सॉफ्टवेअर तयार करण्याचा प्रयत्न केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *