Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

राफेल अन् F-35 पेक्षाही वेगवान! भारताच्या पक्‍क्या मित्रानं दिली जबरदस्त ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढणार

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या बिक्स परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्य आता नव्या टप्प्यावर पोहोचताना दिसत आहे.

भारताने रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टीमच्या आणखी ५ युनिट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर आता भारताकडे या अल्‍ट्रा मॉडर्न एअर डिफेंस सिस्‍टिमचे एकूण १० स्‍क्‍वाड्रन होतील. यानंतर आता रशियाने भारतीय हवाई दलासाठी आणखी दोन मोठ्या ऑफर्स दिल्या आहेत.

रशियाच्या दोन जबरदस्त ऑफर – रशियाने दिलेल्या या ऑफर्समध्ये ५ व्या पिढीचे ‘Su-57’ लढाऊ विमान आणि अत्यंत शक्तिशाली ‘177S’ जेट इंजिनचा समावेश आहे. रशियाने भारताच्या Su-30MKI लढाऊ विमानांच्या ताफ्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘177S’ (Izdeliye 177S) हे प्रगत इंजिन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. महत्वाचे म्हणजे, हे इंजिन जगातील काही शक्तीशाली इंजिनपैकी एक आहे. हे इंजिन १४.५ टन एवढा थ्रस्ट देण्यास सक्षम आहे.

राफेल अन् F-35 पेक्षाही शक्तीशाली – या इंजिनमुळे भारतीय Su-30MKI लढाऊ विमानांचा वेग अमेरिका आणि फ्रान्सच्या ५ व्या पिढीच्या F-35 आणि राफेलपेक्षाही अधिक होईल. याशिवाय, हे इंजिन सध्याच्या AL-31F इंजिनच्या आकाराचेच असल्याने विमानात बदल न करता ते सहज बसवता येईल. याचा सर्व्हिस कालावधी ६,००० तास एवढा असून यामुळे सुमारे ७ टक्के इंधनाचीही बचत होईल.

भारताची एरोस्पेस क्षेत्रातील क्षमता वाढवेल – महत्वाचे म्हणजे, भारतातील ‘एचएएल’ ही संस्था आधीपासूनच परवान्याअंतर्गत रशियन इंजिनांची देखभाल दुरुस्ती आणि निर्मिती करते. यामुळे नव्या 177S इंजिनसंदर्भातील सहकार्य भारतीय एरोस्पेस क्षेत्रातील क्षमता वाढवेल. याशिवाय, Su-57E या ५ व्या पिढीच्या लढाऊ विमानासंदर्भातही दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *