Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

MPSC चे नवे ‘बॉस’ तुकाराम मुंढे? आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा

पुणे : राज्यात सध्या पेपरफुटीवरुन वातावरण तापलं असून एमपीएससी (MPSC) स्पर्धा परीक्षेतील औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. पुण्यातल मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोर्चा काढला होता. या मोर्चात आमदार रोहित पवारांसह विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले होते. या मोर्चात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. एवढचं नाही तर आज पत्रकार परिषद घेत भीमनवर यांच्या जागेवर धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंची नियुक्ती होऊ शकते, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, MPSC आयोगाचे अध्यक्ष हे वादग्रस्त आहेत. त्यांनी अगोदरच्या विभागात जिथे गोंधळ झाला आहे तिथे अनेकदा हे महाशय होते. विवेक भीवनवार यांची कारकिर्द वादग्रस्त आहेत. अनेकांनी यांच्या नियुक्तीला विरोध केला होता एवढटचं नाही तर अनेक पुरावे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दिले आहेत की आधीच्या खात्यात कसा भ्रष्टाचार झाला आहे. ते आयुक्त असताना सगळ्या खात्यात भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्ष भीमानवार हे RTOमध्ये कार्यरत होते तसंच रॅकेट ते MPSC आयोगात सुरू आहे. अजून 40 टक्के पुरावेच आम्ही समोर आणले आहेत. आम्ही लढत राहणार आहोत तुम्ही पाठिंबा द्या तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढू, हा विषय महत्वाचा आहे. या माणसाचा राजीनामा व्हायला पाहिजे.

MPSC आयोगाच्या अध्यक्षपदावर तुकाराम मुंढे, रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

MPSC आयोगाच्या अध्यक्षपदावर तुकाराम मुंढे बसू शकतात मी सगळं चेक केलं आहे, ज्या अटी आहेत त्यानुसार मुंढे अध्यक्ष होऊ शकतात. भीमनवर यांच्या विरोधात आधीच तक्रार गेली आहे. जर कारवाई नाही झाली तर असं म्हणू शकतो की मुख्यमंत्री यांना पाठीशी घालत आहेत कारण ते मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत, असे देखील रोहित पवार म्हणाले.

विद्यार्थ्यांचे कल्याण करा : रोहित पवार

हे आंदोलन माझे नाहीये , जसं जमेल तसं विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. विद्यार्थ्यांना विचारून ठरवू की आंदोलन करायचं आहे की नाही, जर विद्यार्थी म्हणाले तर आंदोलन करु.. तुम्ही विरोधात असताना विद्यार्थ्यांसोबत होतात आता सत्तेत गेला तर गप्प बसतात तुमच्यात हिंमत नाही तुमचा बॉस चुकत आहे तर बॉसच्या विरोधात जा आणि विद्यार्थ्यांचे कल्याण करा असे देखील रोहित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *