Navgan News



Add Space

ताज्या बातम्यानवगण विश्लेषणमहाराष्ट्र

हेल्पलाईन हेल्पलेस १०८ , दोन तास प्रतिक्षा, अखेर गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह मृत्यू…

परभणी : परभणीत सात महिन्यांच्या गर्भवती महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना नांदेडला हलवण्याचा सल्ला दिला होता. मात्र १०८ एम्ब्युलन्सला एकदा नव्हे तर सात वेळा कॉल केला. आणि दोन तासांहून अधिक वेळ उलटल्याने या गर्भवती महिलेचा तिच्या पोटातील बाळाचाही मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

परभणीच्या जिल्हा स्री रुग्णालयात ८ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील वैद्यकीय व्यवस्थेची अवस्था किती विदारक आहे याची चुणूक मिळत आहे.

जिंतूर येथील साठेनगरातील नेवाती मोहल्ला येथे राहणाऱ्या शेख अमीन शेख अयुब यांच्या पत्नी मर्जीनाबी अमीन शेख या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. ८ ऑगस्ट रोजी त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना उपचारासाठी परभणीच्या जिल्हा स्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी मरजीनाबी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यास तेथील डॉक्टरांनी सांगितले.

 

यानंतर या महिलेच्या पतीने सात वेळ १०८ रुग्णवाहिका हेल्पनंबरला संपर्क केला. तरीही दोन तास रुग्णवाहिका पोहचली नाही. त्यामुळे या गर्भवती महिलेचा तिच्या पोटातील बाळासह मृत्यू झाला. या प्रकरणात पतीच्या फिर्यादीवरुन रुग्णवाहिका चालक, त्यावरील डॉक्टर आणि परभणीच्या स्री रुग्णालयाती डॉक्टर अशा पाच जणांविरोधात रविवारी पहाटे कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात आता १०८ रुग्णवाहिकेला नेमके किती वाजता कॉल केले गेले ? कॉल नेमका किती वाजता रिसिव्ह झाला. त्यावेळी उपलब्ध रुग्णवाहिका नेमकी कुठे होती ? आणि रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचण्यास उशीर का झाला ? या प्रश्नांची उत्तरे हवी असल्याचे म्हटले जात आहे.

 

राज्यातील १०८ रुग्णवाहिकेसाठी सात वेळा फोन, २ तास प्रतीक्षा आणि अखेर ७ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, हे अत्यंत संतापजनक असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सामान्य माणसाच्या जीवाची शासकीय यंत्रणेला काहीच किंमत नाही का? असा सवाल देखील रोहित पवार यांनी केला आहे. राज्याचे ‘इन्फ्रामॅन’ म्हणून मिरवणाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेची ही वेशीवर टांगली गेलेली लक्तरं दिसत नाहीत का? राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना सरकार गाढ झोपेत आहे, हे चीड आणणारं आहे असे रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *