Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यानवगण विश्लेषण

अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध थांबवण्याची घोषणा करताच धाड.. धाड.. कोसळले तेलाचे भाव…

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगाला वैताग आला. या युद्धाचे परिणाम फक्त इराण आणि अमेरिका पुरतेच मर्यादित नव्हते तर याचे गंभीर परिणाम भारतासह अन्य देशांवरही होत होती. भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसले. जागतिक बाजारही अस्थिर झाला. अमेरिका इराणवर मोठे हल्ले करत होती. सलग इराणवर हल्ले सुरू होती. होर्मुज खाडी पार करणाऱ्या जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात होते. अखेर काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठी घोषणा केली. अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध सध्या थांबवले आहे. अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध थांबवण्याची घोषणा करताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली. सतत वाढणारे कच्च्या तेलाचे भाव घसरले आहेत. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सुमारे 6 टक्क्यांची घट दिसून आली. हा मोठा दिलासा जगाला म्हणावा लागेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव सतत वाढत होते. आता कुठे दिलासा मिळाला. आखाती देशांमधील कच्च्या तेलाचा व्यवहार 91 डॉलर्सच्या आसपास होत आहे. अमेरिकन कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 44 डॉलर्स इतका आहे. इराणवर अमेरिका मोठे बॉम्ब हल्ले करत होती. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनवले होते. होर्मुज खाडीच्या आसपास अमेरिका हल्ले करत होती.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करतळावर इराणने मोठे हल्ले केले. अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष वाढताना दिसला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा युद्ध पेटले. ज्यानंतर जागतिक बाजारात खळबळ उडाली. अमेरिकेने युद्ध थांबवण्याच्या केलेल्या घोषणेनंतर पुन्हा एकदा जगाने सुटकेचा निश्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *