Navgan News



Add Space

ताज्या बातम्यानवगण विश्लेषण

Video : नौदलाची दोन लढाऊ विमाने एकमेकांना धडकली,विमानांमधून मोठी आग,दोन्ही विमाने कोसळली, नेमक घडल काय?

इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेला मोठा धक्का बसला. इराणकडून अमेरिकेचे फायटर जेट उडवण्यात आलीत. यादरम्यानच आता अजून एक धक्कादायक घटना घडली. ज्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

 

अमेरिकेच्या आयडाहो राज्यात हवाई प्रदर्शनावेळी भीषण अपघात घडला. रविवारी दुपारी माउंटन होम एअर फोर्स बेसवर ‘गनफायटर स्काईज एअर शो’ दरम्यान थेट अमेरिकी नौदलाची दोन लढाऊ विमाने एकमेकांना आदळली. काही वेळ दोन्ही विमाने वेगळी करण्याचा प्रयत्न पायलटकडून करण्यात आला. मात्र, परिस्थिती अधिकच बिघडत गेली. विमानांमधून मोठी आग निघत होती. थेट हवेतून जमिनीवर ही दोन्ही विमाने कोसळली आणि मोठी आग पसरली. तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रचंड मोठी आग लागली. काही वेळातच या एअर शो बंद करण्यात आला. या दोन्ही विमानाची क्रू मेंबर सुरक्षित असल्याचीही माहिती मिळत आहे.

व्हिडिओ येथे पहा !

रिपोर्टनुसार, दोन्ही लढाऊ विमाने हवेत कसरत दाखवत होते. अचानक तोल गेल्याने एक विमान दुसऱ्या विमानाला जाऊन धडकले. आगीचा लोळ विमानातून निघत होता आणि दोन्ही विमाने जमिनीवर कोसळली. या घटनेचा एक संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातात सामील असलेली विमाने यूएस नेव्हीची EA18-G ग्रोव्हलर होती.

तात्काळ या अपघाताची चाैकशी समिती बसवण्यात आली. अपघात नक्की कोणत्या कारणाने झाला, याची सविस्तर चाैकशी होणार आहे. अमेरिकेच्या नौदलाने सांगितले की, रविवारी आयडाहोमधील माउंटन होम एअर फोर्स बेसजवळ एका हवाई प्रदर्शनादरम्यान दोन लष्करी विमानांची हवेत टक्कर झाली. या घटनेनंतर सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *