Navgan News



Add Space

क्राईम

मैत्रिणीने बोलावले अन् १७ वर्षाची तरुणी पार्टीला गेली, फ्लॅटवर मित्रांनी रात्रभर केले अत्याचार…

Spread the love

Crime News : Thane Crime – ठाणे जिल्ह्यातील काशीगाव परिसरात एका अल्पवयीन तरुणीवर पार्टीत आलेल्या दोन तरुणांनी रात्रभर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने पार्टीला बोलावले होते. मात्र, पार्टी सुरू झाल्यानंतर ती तरुणी तिच्या एका मित्रासह निघून गेली आणि नंतर इतर दोन जणांनी तिच्यावर रात्रभर आळीपाळीने बलात्कार केला.

काशीगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पीडितेच्या मैत्रिणीसह चार जणांचा समावेश आहे.

मैत्रीण शीतलने पार्टीसाठी बोलावले आणि…

पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता पीडित तरुणीच्या २५ वर्षीय मैत्रीण शीतल हिने तिला कॉल केला. कॉल करून शीतल पीडित तरुणीला म्हणाली की पार्टीसाठी ये.

पीडित तरुणी शीतलने बोलावलेल्या ठिकाणी गेली. तिथे शीतलने पीडित तरुणीची पीयूष ठाकूर, दुष्यंत सिंह आणि अहत खान या तीन तरुणांसोबत ओळख करुन दिली. त्यानंतर शीतल आणि तीन तरुण तिला घेऊन अहत खान याच्या फ्लॅटवर गेले.

दारू, रात्रभर बलात्कार आणि सोन्याची चेनही चोरली

अहत खान याच्या फ्लॅटवर गेल्यानंतर आरोपी आणि शीतलने मद्यप्राशन केले. त्यांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावले. पीडित तरुणीला नशेत असतानाच शीतल आणि पीयूष हे दोघे फ्लॅटमधून बाहेर निघून गेले. त्यानंतर दोन्ही तरुणांनी पीडित तरुणीवर आळीपाळीने रात्रभर बलात्कार केला.

मध्यरात्रीपासून पहाटे ६ वाजेपर्यंत दोन्ही तरुण तिच्यावर अत्याचार करत होते. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडितेच्या गळ्यातील सोन्याचची ५ ग्रॅमची चेन चोरल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.

मुलगी रात्रभर घरी न आल्याने पालक घाबरले

पीडित तरुणी रात्रभर घरीच आली नाही. त्यामुळे तिचे आईवडील घाबरले. त्यांनी तिचा शोध सुरू केला. सकाळी तरुणी घरी आल्यानंतर ही घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी शीतल, पीयूष ठाकूर, दुष्यंत सिंह आणि अहत खान या चौघांविरुद्ध पोक्सो कायद्यातील कलमान्वये आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत