Navgan News



Add Space

क्राईमताज्या बातम्या

शेजारच्या काकांचं भयानक कृत्य उघड,१३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार,पीडिता ४ महिन्यांची गर्भवती…

लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्रातील भीषण वास्तव समोर येत आहे. भंडाऱ्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

भंडाऱ्यात शेजारी राहणाऱ्या नराधमानेच एका १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातून मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणात लाखनी पोलिसात आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता ४ महिन्यांची गर्भवती…

डिसेंबर २०२५ मध्ये पीडित मुलगी आरोपी रतनलाल उर्फ जागेश्वर सुरचंद कुळमते (५०) याच्या घरी भाजी मागण्यासाठी गेली होती. पीडिता अल्पवयीन असल्याचं माहीत असूनही आरोपीने फायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला आणि तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकेन, अशी धमकी आरोपीने दिली होती. यामुळे पीडिता कमालीच्या दहशतीखाली होती.

काही दिवसांपूर्वी पीडितेच्या प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी ती चार महिन्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडितेच्या (४५) वर्षीय वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपी रतनलाल कुळमते याच्याविरुद्ध लाखनी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुद्ध विविध कलमाव्ये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष बारसे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *