
पवन हंस लिमिटेडने, भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार, या भरतीने अनेक टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अनेक निकष अर्ज कर्त्यांना पात्र करावे लागणार आहे. त्याशिवाय अर्ज करता येणार नाही, चला तर मग जाणून घेऊयात या भरती संदर्भात संपूर्ण माहिती:
या भरतीच्या आधारे Graduate Engineer Trainee पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. मुळात, भरतीसाठी घाई करणे गरजेचे आहे कारण किमान २० जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. २१ जून २०२५ या तारखेपासून भरतीला सुरुवात करण्यात येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात pawanhans.co.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून करता येईल. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. Gen/OBC/EWS या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २९५ रुपये भरावे लागणार आहे. तर इतर आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे.
निकषांनुसार, जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर उमेदवारांची शिक्षणमर्यदा B.E./B.Tech ठेवण्यात आली आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया चार टप्यात घेण्यात येईल. सर्वप्रथम, उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग GATE-2025 च्या गुणांवर आधारित केली जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम गुणवत्ता यादी GATE-2025 स्कोअर (80%) आणि वैयक्तिक मुलाखत (20%) यावर आधारित तयार केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना अंतिम नियुक्तीपूर्वी कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
अधिकृत वेबसाइट pawanhans.co.in ला भेट द्या.
“Careers” विभागात जा.
इच्छित पद निवडा आणि “Apply Online” वर क्लिक करा.
अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सबमिट करा.