पृथ्वीबाबत अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या माहिती नाहीत. अद्यापही अनेक रहस्य आहेत. अशाच एका रहस्याचा शोध कित्येक वर्षांपासून नासाचे शास्त्रज्ञ घेत होते. 60 वर्षांपासून हा शोध सुरू होता.
अखेर 60 वर्षांनंतर नासाच्या हाती मोठी माहिती लागली आहे.
नासाच्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमने सबर्बिटल रॉकेटद्वारे गोळा केलेल्या डेटाद्वारे एम्बिपोलर इलेक्ट्रिक फील्डचा शोध लावला आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी 60 वर्षांपूर्वी पृथ्वीवर विद्युत क्षेत्राच्या अस्तित्वाची कल्पना केली होती. पृथ्वीवर लपलेलं विद्युत क्षेत्र त्यांनी शोधून काढलं आहे.
एम्बिपोलर इलेक्ट्रिक फील्ड
हे क्षेत्र ध्रुवीय वारा चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. हे चार्ज केलेले कण सुपरसॉनिक वेगाने अवकाशात सोडण्यास सक्षम आहे. पृथ्वीभोवती एक विद्युत क्षेत्र एक प्रकारचे ध्रुवीय वारा निर्माण करत असल्याचं संशोधकांना दिसून आलं आहे. जे कणांना सुपरसॉनिक वेगाने अंतराळात घेऊन जातं.
शास्त्रज्ञांनी मोजली एम्बीपोलर इलेक्ट्रिक फील्डची ताकद
नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात असं सांगण्यात आलं आहे की, रॉकेटमधून मिळालेल्या डेटाच्या आधारे, शास्त्रज्ञांनी एम्बीपोलर इलेक्ट्रिक फील्डची ताकद मोजली आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की यामुळे वरच्या वातावरणातील थराचा आयनोस्फिअरवर कसा परिणाम होतो हे दिसून आलं आहे.
शास्त्रज्ञ ग्लिन कॉलिन्सन म्हणतात, “वातावरण असलेल्या कोणत्याही ग्रहामध्ये एम्बिपोलर फील्ड असणं आवश्यक आहे. आता आपण त्याचं मोजमाप केलं आहे, कालांतराने त्याचा आपल्या ग्रहावर तसंच इतर ग्रहांवर कसा परिणाम झाला आहे हे आपण शिकू शकतो.”
पृथ्वीबाबत आणखी काही फॅक्ट्स
पृथ्वी स्वतःसह सूर्याभोवतीही गरागरा फिरते. कोणताही आधार नसताना पृथ्वी अवकाशात हवेत तशीच राहते. स्वतःभोवती आणि सूर्याभोवती गरागरा फिरताना ती इतर ग्रहांना धडकत नाही. इतर ग्रहांसोबत तिची कधीच टक्कर होत नाही. याला कारण आहे ती तिच्यातील एक शक्ती. ही शक्ती आहे विशेष गुरुत्वाकर्षण. ज्यामुळे ती हवेत राहते. पृथ्वीच्या या विशेष शक्तीमुळे आणि इतर बाह्य दाबामुळे ती त्याच स्थितीत अवकाशात तरंगत राहते.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सांताक्रूझ शहरात एक रहस्यमय ठिकाण आहे. मिस्ट्री स्पॉट या नावाने इथे एक ठिकाण प्रसिद्ध आहे. या गूढ जागेवर गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य होते. काही संशोधकांनी 1939 साली या जागेचा शोध लावला होता. यानंतर 1940 मध्ये जॉर्ज प्राथर नावाच्या व्यक्तीने ते सर्वसामान्यांसाठी खुले केले.
हाऊ स्टफ वर्क्स वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पृथ्वीचं खरं वय शोधण्याचा प्रयत्न शतकानुशतकं केला जात आहे. सर्वांत लोकप्रिय थिअरीनुसार, पृथ्वीचं वय 450 कोटी वर्षं आहे. पृथ्वीच्या वयाबद्दल वेगवेगळे अंदाज लावले गेले आहेत. ग्रीक तत्त्ववेत्ते अरस्तू यांनी पृथ्वीचं वय असंख्य वर्षं असल्याचं सांगितलं होतं.