ताज्या बातम्या

डाळ-तांदळाला किड लागली आहे का? ‘ही’ सोपी ट्रीक वापरा, झटपट होईल साफ


भारतात जवळपास प्रत्येक राज्यामध्ये डाळ-तांदूळ नियमित सेवन केले जाते. भारतीय स्वयंपाक घरामध्ये रोजच्या जेवणात डाळ-भात असतोच. आपल्याकडे कित्येक प्रकारच्या डाळींचे उत्पादन केले जाते ज्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात.

हरभरा डाळ, उडद डाळ, मुंग डाळ, मसूर सह विविध डाळींचे प्रकार आहे. डाळीपासून ओट्स, चीला असे कित्येक पदार्थ तयार केले जातात. आपल्याकडे डाळीशिवाय भातदेखील आवडीने खातात. अशावेळी स्वयंपाकघरात डाळ तांदूळ साठवून ठेवावे लागते. पण दिर्घकाळ डाळ किंवा तांदूळ साठवल्याने त्यांना कीड लागू शकते. डाळीमधील खडे साफ करुन ती शिजवली जाते. पण किड साफ करणे थोडे मेहनतीचे काम आहे. कीड लागलेली डाळी हळू हळू खराब होते. जर डाळ किंवा तांदळाला कीड लागली तर ती सहज साफ करण्यासाठी काही सोप्या टीप्स आमच्याकडे आहेत.

डाळ-तांदळातून कीड साफ करण्याची पद्धत

हळकुंड वापरा
डाळ तांदुळाला कीड लागल्यास ते साफ करण्यासाठी हळकुंडाचा वापर करू शकता. हळदीचा गंध तीव्र असतो ज्यामुळे डाळीतून कीड निघून जाते. काही हळदींचे गाठ बांधून डाळ किंवा तांदुळमध्ये टाका त्यामुळे काळी किंवा पांढरी जाळी लागल्यास त्यातून किड बाहेर निघून येतील.

लसून वापरा
आख्खा लसून धान्याला कीड लागण्यापासून वाचवू शकतो. लसूनच्या तीव्र वासामुळे कीड निघून जाईल. धान्यात आख्खा लसून ठेवून आणि सुकवा. सुकलेला लसनाच्या पाकळ्या या किड्यांना धान्यातून बाहेर येण्यास भाग पाडतात.

मोहरीचे तेल
डाळीतील कीड साफ करण्यासाठी तसेच अळ्या होण्यापासून वाचविण्यासाठी मोहरीचे तेल वापरू शकता. जर कमी डाळ साठवणार असाल तर मोहरीचे तेल वापरा. दोन किलो डाळीमध्ये दोन चमचे मोहरीचे तेल लावून उन्हात सुकवून साठवा.

धान्यातून खडे बाहेर काढण्यासाठी टीप्स
डाळ, तांदूळ धान्यामध्ये खडे असतात, जे केवळ पाण्याने साफ करता येत नाहीत. खडे जड असतात आणि पाण्याबरोबरच डाळीमध्ये तळाशी जातात. त्यामुळे डाळीमधील खडे स्वच्छ करण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब करा.

  • ताटात डाळ पसरवून, तुम्ही निवडून त्यातून खडे किंवा घाण काढू शकता.
  • जमिनीवर किंवा मोठ्या ट्रेमध्ये डाळ पसरवून खडे सहज काढता येतात.
  • डाळीमध्ये माती असल्यास डाळ दोन ते तीन वेळा धुवावी लागतो. यामुळे डाळींची पॉलिशही निघून जाते. धुतलेले पाणी जोपर्यंत रंग बदलत राहते तोपर्यंत डाळ येते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *