
प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.सध्या त्या 92 वर्षांच्या आहेत.आमचे प्रतिनिधी मिहीर त्रिवेदी यांनी ही माहिती दिली आहे.महापौर किशोरी पेडणेकर यांनी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु घाबरण्याचं कारण नाही त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत.
त्या रुग्णालयातही राहू शकतात, किंवा त्या घरातसुद्धा राहून यावर उपचार घेऊ शकतात.