Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू, अन्य 11 जण जखमी; एकूण जखमींची संख्या 300

सौदी अरेबियातील रियाध विमानतळावर शनिवारी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ११ भारतीय नागरिकांपैकी एका भारतीयाचा मृत्यू झाल्याचे भारतीय दूतावासाने रविवारी सांगितले. दूतावासाने मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून त्यांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

‘एक्स’वरील पोस्टमध्ये भारतीय दूतावासाने म्हटले, 10 ऑक्टोबर रोजी रियाध विमानतळावर झालेल्या हल्ल्याबाबतची माहिती. रियाधमधील हल्ल्यात जखमी झालेल्या एका भारतीय नागरिकाचा आज दुर्दैवाने मृत्यू झाल्याचे समजते. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. आम्ही कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत आणि पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू.

असदुद्दीन ओवेसी यांचा दावा; मृताच्या कुटुंबातील सदस्यही जखमी

दरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले की, शनिवारी रियाध विमानतळावर झालेल्या हल्ल्यात मोहम्मद युसूफ अली नावाच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. अली यांची पत्नी आणि दोन मुलेही या हल्ल्यात जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

ओवेसी यांनी रियाधमधील भारतीय दूतावासातील उपप्रमुखांशी (डेप्युटी चीफ ऑफ मिशन) चर्चा केल्याचे सांगितले. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी रविवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, सौदी अरेबियातील भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.

या भारतीय नागरिकाच्या मृत्यूमुळे रियाध विमानतळावरील हल्ल्यातील मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, या कठीण परिस्थितीत आमचा दूतावास आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे.

या भारतीय नागरिकाच्या मृत्यूमुळे रियाध विमानतळावरील हल्ल्यातील मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, या कठीण परिस्थितीत आमचा दूतावास आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे.

रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला

रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा भारत सरकारने तीव्र निषेध केला आहे. नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर वारंवार होणारे हल्ले ‘पूर्णपणे अस्वीकार्य’ असल्याचे भारताने म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र विमानतळाच्या त्या परिसरात आदळले, जिथे टर्मिनल 3 आणि 4 आहेत. या दोन्ही टर्मिनल्सवरून देशांतर्गत विमानसेवा चालवली जाते.

सौदी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मृतांमध्ये सौदी अरेबियाचे चार नागरिक, बांगलादेशचे दोन नागरिक आणि पॅलेस्टाईन, अमेरिका, इजिप्त, जॉर्डन, सीरिया व सुदान येथील नागरिकांचा समावेश होता. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने या हल्ल्यासाठी शेजारील येमेनमधील इराणसमर्थित हुथी बंडखोरांना जबाबदार धरले आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले, गेल्या काही दिवसांपासून रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांचा, विशेषतः 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या कायरतापूर्ण हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या हल्ल्यांमुळे जीवितहानी झाली असून अनेक जण जखमी झाले आहेत आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

मंत्रालयाने पुढे म्हटले, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर वारंवार होणारे हल्ले पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. हे हल्ले तातडीने थांबवले गेले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *