Navgan News



Add Space

ताज्या बातम्यानवगण विश्लेषण

Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल…

भुकेल्या पिल्लासाठी आई हत्तीणीने झाडाला जोरात धडक दिली.
झाडावरून फळं पडताच पिल्लू आनंदाने बागडत फळं खाऊ लागलं.
व्हिडीओला १७ लाख व्ह्यूज; मात्र तो खरा की AI-निर्मित, याबाबत निश्चित माहिती नाही.

आईसारखं प्रेम जगात कुठेच मिळत नाही. माणूस असो, प्राणी असो किंवा पक्षी, आई आपल्या पिल्लासाठी काहीही करायला तयार असते. असाच एक व्हिडीओआता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय आणि तो बघून डोळ्यात पाणी येतं.
काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडिओ येथे पहा !

 

एका छोट्या हत्तीच्या पिल्लाला खूप भूक लागली आहे. ते सारखं वर झाडाकडे बघते आणि झाडावर खूप सारी फळं लागली आहेत. पण पिल्लू खूप छोटं, त्याची सोंड तिथपर्यंत पोचतच नाही. ते फक्त बघत राहतं. त्याची आई हे सगळं बघत असते. तिला कळतं की पिल्लाला फळं हवी आहेत. ती पण वर बघते. तिची सोंड पण फळांपर्यंत पोचत नाही. फळं खूप उंचावर आहेत. मग आई काय करते? ती मागे जाते आणि पूर्ण ताकदीने झाडाला धडक देते. एकदा नाही, दोनदा नाही, जोरात झाड हलवते. आणि काय चमत्कार होतो, झाडावरून सगळी फळं खाली पडायला लागतात. जणूकाही फळांचा पाऊसच पडतो. फळे खाली पडल्याने पिल्लू एकदम खुश झाले.

 

आनंदाने बागडू लागले. फळे खायला लागतं. त्या पिल्लाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. हा व्हिडीओ coreculture.inn नावाच्या पेजने इंस्टाग्रामवर टाकला आहे. आतापर्यंत १७ लाख लोकांनी तो बघितला आहे.

 

झाडाचं खोड पण झिजलं

व्हिडीओ नीट बघितला तर एक गोष्ट दिसते. हत्तीने जेव्हा झाडाला धडक दिली तेव्हा झाडाचं खोड थोडं झिजलं आहे. म्हणजे विचार करा तिने किती जोरात धडक दिली असेल. हत्तीमध्ये खूप ताकद असते पण तरीही धडक दिल्यावर तिला पण लागलं असेलच. पण पिल्लासाठी तिने त्या दुखण्याचा विचार पण केला नाही. हीच तर आई असते.

 

लोक काय बोलत आहेत?

या व्हिडीओवर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत.एका युजरने लिहिलंय, आई कोणत्याही जातीची असो, तिचं प्रेम सारखंच असतं.दुसरा म्हणतो, म्हणूनच मला हत्ती सगळ्यात जास्त आवडतो.तर एकजण म्हणाला, आपण माणसांनीच जंगल नष्ट केली. प्राण्यांचं घर, त्यांचं खाणं सगळं आपणच हिसकावून घेतलंय.

हा व्हिडीओ खरा आहे की AI ने बनवला आहे?

काही नेटकरी म्हणत आहेत की, हा व्हिडीओ AI ने बनवला असेल. कारण हा व्हिडीओ कुठे घेतला, यांची काहीच माहिती नसल्याने हा व्हिडिओ खरा आहे की खोटा हे सांगता येत नाही.पण खरं सांगायचं तर हा व्हिडीओ जरी AI ने बनवला असेल तरी बघून मनाला खूप बरं वाटतं. त्या पिल्लाचा आनंद बघून आपल्याला पण आनंद होतो.आईचं प्रेम कसं असतं हे या एका छोट्या व्हिडीओने दाखवून दिलं आहे. आई आपल्या लेकरासाठी स्वतःच्या जीवाची पण पर्वा करत नाही. माणसाने प्राण्यांकडून हेच शिकायला पाहिजे.

 

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *