Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मोदी सरकारचे मंत्री कुठे गुंतवतात पैसा? शेअर बाजार की FD? कॅबिनेट मंत्र्यांचा गुंतवणूक फॉर्म्युला काय?

विष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक जण गुंतवणूक करतात. काही जण स्टॉक बाजारात पैसे गुंतवतात. काही म्युच्युअल फंडमध्ये तर काही जण जमीन, भूखंड, फ्लॅट खरेदी करते. पण मोठं मोठे मंत्री कुठे गुंतवणूक करतात याविषयीची उत्सुकता सर्वांमध्येच असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुंतवणूक एसबीआयच्या एफडीमध्ये असल्याचे यावर्षीच्या आकडेवारीवरून समोर आले होते. पण त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री कुठे पैसे गुंतवतात? शेअर बाजारात की एफडीमध्ये? काय आहे त्यांच्या गुंतवणुकीचा फॉर्म्युला? जाणून घ्या.

मोदी कॅबिनेटच्या मंत्र्यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी मालमत्ता विवरण दिले आहे. संपत्तीची घोषणा केली आहे. आकडेवारीनुसार, मंत्र्यांनी शेअर बाजाराऐवजी मुदत ठेव योजनेला (FD) अधिक पसंती दिली आहे. जमीन, दागदागिने आणि पशूधनातही मोठी गुंतवणूक केली आहे. सुरक्षित पर्यायांमध्ये पैसा गुंतवला आहे.

FD सर्वात आवडता पर्याय

आर्थिक वर्ष 2025-26 साठी कॅबिनेट मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मंत्र्यांपैकी 8 जणांनी मुदत ठेवमध्ये गुंतवणूक केली आहे. शेअर बाजारात त्यांनी गुंतवणूक केली नाही. तर 15 मंत्र्यांनी बाजारात गुंतवणूक केली आहे. त्यातील केवळ पाच मंत्र्यांनी म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवलेला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, गृह आणि शहर मंत्रालयाचे मंत्री मनोहर लाल, पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह, नागरी हवाई मंत्री के. आर. नायडू, आदिवासी मंत्री जुआल ओराम आणि मंत्री गिरिराज सिंह यासारख्या बड्या नेत्यांनी केवळ मुदत ठेवमध्ये गुंतवणूक केली आहे. शेअर बाजारा त्यांनी कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.

अमित शाह यांची गुंतवणूक कुठे?

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या शपथपत्रानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुचीबद्ध रोख्यांमध्ये 2.23 कोटी रुपये आणि असूचीबद्ध रोख्यांमध्ये 3.07 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे जाहीर केले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी 5.59 कोटी रुपयांची FD आणि सरकारी कंपनी IRFC च्या बाँडमध्ये 50 लाख रुपये गुंतवले आहेत. या ठिकाणी पैसा बुडण्याची भीती अजिबात नाही. जे पी नड्डा यांनी सोने आणि बांधकाम क्षेत्राला अधिक महत्त्व दिले आहे. घर बांधणीसाठी त्यांनी बँकेचे कर्ज आणि वैयक्तिक बचतीचा वापर केला आहे. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सूचीबद्ध रोख्यात 9.70 कोटी रुपये आणि असूचीबद्ध रोख्यांमध्ये 1.01 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *