Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

24 तास पोलीस बंदोबस्त असलेल्या सुरक्षित ठिकाणी तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनास्थळी एन्काऊंटर; पोलीस अधिकारी जखमी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत देशाला हादरवाणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराचे एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रसिद्ध मंदिराजवळ हा धक्कादायक प्रकार घडला.

घटनास्थळी पोलिसांनी एन्काऊंटर केला. यात पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.

दक्षिण दिल्लीतील सर्वात उच्चभ्रू परिसरात, कालकाजी मंदिर आणि इस्कॉन मंदिराच्या जवळ ही घटना घडली. या परिसरात का.म कडक सुरक्षा व्यवस्था असते. 24 तास पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असते. पर्यटकांसह मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी भेट देतात. अशा ठिकाणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यास, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका चकमकीनंतर एका आरोपीला अटक केली असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 सप्टेंबर रोजी रात्री 8:45 वाजता डीडी क्रमांक 93 वर इस्कॉन मंदिर असलेल्या कालकाजी मंदिराजवळ बलात्कार झाल्याची माहिती देणारा पीसीआर कॉल आला. पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी 17 वर्षांची पीडित तरुणी घटनास्थळी उपस्थित होती. ती एका मैत्रिणीसोबत दिल्लीतील कालकाजी मंदिरात आली होती. गेट क्रमांक 7 मधून आस्था कुंज पार्कमध्ये शिरल्या. तिथे 3 जणांनी स्वतःला पोलीस अधिकारी भासवून तिच्याशी संपर्क साधला आणि तिला एका निर्जन ठिकाणी नेले असे तरुणीने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी तात्काळ या तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात दाखल केले. गुन्हे घटनास्थळ आणि न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने आणि इतर पुरावे गोळा केले. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला . पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी एकाने तिच्या मैत्रिणीला पकडून तिच्यावर बलात्कार केला. त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोन पुरुषांनीही तिच्यावर बलात्कार केला असे पीडितेने तक्रारीत सांगितले.

पोलिसांनी आसिफ नावाच्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक पाळत ठेवून आरोपींना ओळखण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान, आसिफ अमर कॉलनीतील डीएम ऑफिस रोडजवळ सापडला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी हेड कॉन्स्टेबल राजेशच्या बुलेटप्रूफ जॅकेटला लागली. त्यानंतर राजेशने आत्मसंरक्षणासाठी दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी आसिफच्या उजव्या पायाला लागली. आसिफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चकमकीनंतर, घटनास्थळी गुन्हेगारी तपास पथक आणि एफएसएल पथकाला बोलावण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोटारसायकल आणि एक पिस्तूल जप्त केले. उर्वरित दोन आरोपींना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. या प्रकरणी बीएनएस आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *