Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

अभिनेते गिरीश ओक यांची बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “ती भयंकर.”

अभिनय, अदाकारी आणि नृत्याने अनेकांना भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्याबरोबर काम करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. नवोदित कलाकार ते अगदी मनोरंजनविश्वात अनेक वर्षांपासून काम करत असलेले ज्येष्ठ कलाकार.

अशातच आता लोकप्रिय मराठी अभिनेते गिरीश ओक यांनीही रेखा यांचं कौतुक करत त्यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.

गिरीश ओक यांनी रेखा या त्यांच्या आवडत्या अभिनेत्री असून त्यांच्याबरोबर काम करण्याची भविष्यात कधी संधी मिळाली तर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल याबद्दल सांगितलं आहे. सर्व काहीला दिलेल्या मुलाखतीत गिरीश ओक यांनी याबद्दल सांगतिलं आहे. करिअरच्या सुरुवातीचा किस्सा सांगत असताना त्यांनी यावेळी रेखा यांचा उल्लेख करत ते त्यांचे चाहते असल्याचं सांगितलं.

रेखाबद्दल काय म्हणाले गिरीश ओक?

मुलाखतीत गिरीश ओक यांना पणशीकरांचा रोल करताना काय वाटलं होतं असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “एकाचवेळी भीती आणि आनंद अशी जी भावना असते असं वाटलं होतं. म्हणजे समजा माझ्या खूप आवडत्या नटीबरोबर काम करण्याची संधी मळाली तर काय होईल तसं वाटलं मला.” यावेळी ते म्हणाले, “माझी आवडती नटी उदाहर्णार्थ रेखाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ती मला भयंकर आवडते. तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर मला एकाचवेळी भीती आणि आनंद वाटेल.”

गिरीश ओक यांनी या मुलाखतीत त्यांच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यतील महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल सांगितलं. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कशी झाली. त्याआधी ते डॉक्टरी करत होते पण ठरावीक वेळेची नोकरी करण्यात त्यांचं मन रमत नव्हतं म्हणून त्यांनी ते सोडलं असं म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी तरुण असताना कॉलेजमधील आठवणी सांगताना काही दिवस ते तुरुंगातही होते अशीही आठवण सांगितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *