Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मुसलमानांना गरब्यात यायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या बहिणी आणि मुली यांना आणावे; आमचे तरुणही सिद्ध आहेत

मुसलमानांनी गरब्याला एकटे येऊ नये, त्यांनी समवेत त्यांच्या बहिणी आणि मुली यांनाही आणावे. आमचे तरुणही सिद्ध आहेत, असे विधान येथील हुजूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलतांना केले.

जर मुसलमानांना कायमस्वरूपी हिंदु धर्मात प्रवेश करायचा असेल, तर आमची त्यालाही सिद्धता आहे. या, ‘जय श्री राम’ म्हणा आणि कपाळाला टिळा लावा; कुणाचीही त्याला हरकत असणार नाही’, असेही ते पुढे म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेस आणि ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) पक्षांनी भाजपवर टीका केली आहे.

आमदार शर्मा यांनी पुढे म्हटले की, जर गरब्याचे तमाशात रूपांतर करण्याचा किंवा तिथे ‘लव्ह जिहाद’चा प्रयत्न झाला, तर आमचे तरुण त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत. तरुणांनी आई-वडिलांची सेवा करावी, आपल्या बहिणींचे रक्षण करावे आणि जगदंबेचा आशीर्वाद घेऊन ‘राक्षसां’चा संहार करण्यासाठी सिद्ध रहावे.

भोपाळ मध्य मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांनी म्हटले की, रामेश्वर शर्मा यांचे विधान अत्यंत नीच आणि हलक्या दर्जाचे आहे. त्यांनी त्यांची भाषा सुधारावी आणि असभ्यपणे बोलणे बंद करावे. मुसलमान गरब्याला जात नाहीत, (खोटे बोला; पण रेटून बोला मानसिकतेचे मसूद ! मुसलमान गरब्याला ओळख लपवून येतात आणि हिंदु मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात, हे उघड झाल्यानेच हिंदूंकडून त्यांना अशा प्रकारे विरोध केला जात आहे. मसूद यांनी मुसलमानांना सांगायला हवे की, त्यांनी असे प्रकार करायला गरब्याला जाऊ नये. असे आवाहन करण्याचे धाडस ते का करत नाहीत ? – संपादक) त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. अशी चिथावणीखोर वक्तव्ये त्यांनी थांबवावीत, अन्यथा जनता त्यांना योग्य धडा शिकवेल, अशी चेतावणी त्यांनी दिली.

ए.आय.एम्.आय.एम्.चे मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्ष मोहसीन अली खान यांनी म्हटले की, अशी विधाने देशात फूट पाडण्याचे काम करतात. रामेश्वर शर्मा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांच्याशी चर्चा करावी. जर शर्मा मुसलमानांना त्यांच्या बहिणी-मुली यांना गरब्यात आणण्यास सांगत असतील, तर भाजपचे मुसलमान नेते अन्वर पटेल, जमाल सिद्दीकी आणि सय्यद जफर इस्लाम हे त्यांच्या बहिणी-मुली यांना गरब्याला घेऊन जाणार का ? असा प्रश्न विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *